पार्किंगच्या जागेत आढळले गुदाम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

नाशिक - महापौर रंजना भानसी यांनी आज त्यांच्याच प्रभाग एकमध्ये स्टिंग ऑपरेशन करून पार्किंगच्या जागेवर गुदाम असल्याचे निदर्शनास आणून दिले. आणखी दोन ठिकाणी रुग्णालयाच्या पार्किंगची जागा विनावापर पडून आहे. पार्किंग असूनही मिठाईच्या दुकानासमोर वाहने लावली जात असल्याचेही उघडकीस आले. शहरात सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात समस्या असल्याने पार्किंगच्या जागांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना महापौर भानसी यांनी दिल्या.

महापौर भानसी यांनी आज पार्किंगच्या जागेचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी स्टिंग ऑपरेशन केले. दिंडोरी रोडवरील गजपंथ बसस्थानकाजवळ संजय हिरावत यांच्या मालकीच्या अभिषेक प्लाझा व्यावसायिक संकुलात तळमजल्यावर शंभर बाय पन्नास फूट जागा पार्किंगसाठी असताना, त्या जागेत शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचे गुदाम आढळले. विशेष म्हणजे, याच इमारतीत मंगल कार्यालयही आहे. कार्यक्रम असल्यास रस्त्यावर वाहने लागतात व त्यातून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडत असल्याचे महापौर भानसी यांनी सांगितले. देवधर शाळेजवळील कलानगर परिसरातील शिव प्लाझा या चारमजली इमारतीत पटेल पॉलिक्‍लिनिक व नर्सरी शाळा चालवली जाते. मात्र, पार्किंगची व्यवस्था असूनही इमारतीच्या मार्जिन स्पेसमध्ये वाहने लावली जात असल्याचे निदर्शनास आले. याच इमारतीत मधुर स्वीट्‌सच्या बेकायदा बांधकामाचीही पाहणी करण्यात आली. म्हसरूळ शिवारातील जैन धर्मार्थ रुग्णालयाचे काम सुरू आहे. तेथे पार्किंगसाठी पुरेशी जागा नाही. पार्किंगच्या जागेत पक्के बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास आले. महापौरांसमवेत नगरसेवक अरुण पवार, नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण व उपअभियंता दौलत घुले उपस्थित होते.

शहरात पार्किंगचा अनधिकृत वापर होत असल्याने सर्वेक्षणाच्या सूचना नगररचना विभागाला दिल्या आहेत. पार्किंगचा वापर अन्य कारणासाठी होत असल्याने वाहने रस्त्यावर लागून वाहतूक ठप्प होते. 

- रंजना भानसी, महापौर

Web Title: nashik news patking space Godown