प्लास्टिक बंदीवर आयुक्तांनी मागविले कायदेशीर मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

नाशिक -  पर्यावरणासह शहरातील गटारी तुंबण्यास कारणीभूत ठरणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवरच सरसकट बंदी घालण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून सुरू असून, नगरसेवक शशिकांत जाधव यांनी मांडलेल्या प्रस्तावावरून महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी पर्यावरण विभागाकडून कायदेशीर मार्गदर्शन मागविले आहे.

शहरात पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरण्यास परवानगी असली, तरी त्यापेक्षा अधिक जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे अशा पिशव्या वापरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे, तरी पिशव्या वापरण्याचे प्रमाण घटत नाही. प्रत्येक घरातून रोज प्लास्टिकचा कचरा बाहेर पडत आहे. परिणामी रस्त्यावर आढळणाऱ्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकचेच प्रमाण अधिक दिसते. शहरात पावसामुळे गटारी तुंबतात त्यालासुद्धा प्लास्टिकच कारणीभूत ठरल्याचा दावा महापालिकेने केला आहे. सध्या पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर होत आहे. त्यासुद्धा प्लास्टिकच्या पिशव्या नकोत, अशी भूमिका नगरसेवक जाधव यांनी घेत महासभेत प्लास्टिक पिशवीबंदीचा प्रस्ताव सादर केला. त्या प्रस्तावावरून आयुक्तांनी पर्यावरण विभागाकडून मार्गदर्शन मागविले आहे.

Web Title: nashik news plastic environment