वाढत्या फसवणुकीमुळे गुंतवणूकदारांची सजगता महत्त्वाची 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

नाशिक - सद्यःस्थितीत आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहेत. गुंतवणूकदारांनी सजग राहण्याची गरज आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे ग्राहकांची विश्‍वासार्हता टिकली आहे. एलआयसीचे काम देशासह विदेशात विस्तारले असल्याची बाब आनंददायी आहे, असे प्रतिपादन पोलिस आयुक्‍त डॉ. रवींद्र सिंगल यांनी येथे केले. 

सावरकरनगर येथील विश्‍वास लॉन्स येथे भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या हीरक जयंती महोत्सवानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, संदीप विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. रामचंद्रन, केंद्रीय उत्पादन शुल्क व जीएसटी विभागाचे सहाय्यक आयुक्‍त पांडुरंग राऊत, माजी आमदार माणिकराव कोकाटे, महेश हिरे, बीएसएनएलचे महाप्रबंधक नितीन महाजन, एलआयसीचे क्षेत्रीय प्रबंधक प्रदीप शेणै, विपणन प्रबंधक अभय कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

आमदार सीमा हिरे म्हणाल्या, की एलआयसीने ग्राहकांचा विश्‍वास जिंकला आहे. या महामंडळामार्फत जनतेची सेवा घडते आहे. आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या, की बचतीचा उत्तम पर्याय व सोबत करात सवलत मिळविण्यासाठी एलआयसी उपयोगी ठरते. 

"हंडाभर चांदण्यां'चा प्रयोग अन्‌ सुरेल मैफल 
या वेळी उपस्थितांसाठी राष्ट्रीय पारितोषिकविजेते नाटक हंडाभर चांदण्यांचा प्रयोग सादर करण्यात आला. ग्रामीण भागातील पाणीटंचाईची भीषण समस्या व त्यामुळे निर्माण होणारे पेच उपस्थितांसमोर सादर करण्यात आले. या नाटकास उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. तसेच या वेळी "जीवन (ज) गायचं' हा संगीतमय कार्यक्रम संजय गिते व त्यांच्या सहकलाकारांनी सादर केला. सदाबहार गीतांचे सादरीकरण करत कलावंतांनी उपस्थितांचे निखळ मनोरंजन केले. 

Web Title: nashik news Police Commissioner