सबका दोस्त, इंडियन पोस्ट!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

नाशिक - पोस्टमनच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी नाशिक सायकलिस्टतर्फे पोस्टमन सायकल राइड घेण्यात आली. ‘सबका दोस्त, इंडियन पोस्ट’चा नारा देत सुमारे ऐंशी पुरुष-महिला पोस्टमनने तर सायकलिस्टच्या सदस्यांनीही राइडमध्ये सहभाग नोंदविला. टपाल खात्याच्या मुख्यालयापासून सुरवात झालेल्या राइडचा समारोप गोल्फ क्‍लब मैदान येथे झाला.

नुकत्याच झालेल्या पोस्टमन सप्ताहांतर्गत नाशिक सायकलिस्टतर्फे राइड करण्यात आली. पोस्टमनना सुरक्षेसाठी सायकल हेल्मेट व सायकलवर कागदपत्रे वाहून नेण्यासाठी सोयीस्कर असेल अशी अनोखी बॅग भेट म्हणून देण्यात आली. उद्‌घाटनप्रसंगी आमदार सीमा हिरे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविला. समारोप कार्यक्रमात अध्यक्ष प्रवीण खाबिया यांनी स्वागत केले. सचिव नितीन भोसले, संयोजक वैभव शेटे यांच्यासह महाराष्ट्र चेंबर्सचे अध्यक्ष मंडलेचा, टपाल कार्यालयातील वरिष्ठ अधीक्षक पी. जे. काखंडकी, जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे सचिव नितीन नागरे, नाशिक मुख्य टपाल कार्यालयाचे अधिकारी आर. एस. बोटलवार, एस. यू. पाटील, नाशिक मुख्य कार्यालयाचे सीनिअर पोस्टमास्टर एम. एस. अहिरराव, गोळे कॉलनी पोस्ट कार्यालयाचे पीआरआय वाय. एस. कुतासकर, जैन सोशल ग्रुप (जेएसज) प्लॅटिनमचे माजी अध्यक्ष सतीश हिरण, सचिव पौर्णिमा सराफ, उपाध्यक्ष राहुल पारख, कोठारी बॅगचे संचालक कमलेश कोठारी, मानकर बॅग हाउसचे संचालक अतुल मानकर, लुथरा एजन्सीजचे राज लुथरा व आनंद ठकार उपस्थित होते.

Web Title: nashik news post office pstman