तबलावादक भडकमकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

नाशिक - पंडित जितेंद्र अभिषेकी, सुरेश तळवळकर, राजा काळे, रघुनंदन पणशीकर यांना साथसंगीत करणारे प्रसिद्ध तबलावादक व एसएमआरके महाविद्यालयातील प्राध्यापक प्रमोद कमलाकर भडकमकर (वय 53) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने मंगळवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी तबलावादक वैष्णवी असा परिवार आहे.

भडकमकर हे सकाळी व्यायाम करण्यासाठी जात असत. आज व्यायाम करून घरी आल्यानंतर काहीवेळातच हदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते खाली कोसळले. त्यांना मॅग्नम हॉस्पिटलमध्ये नेले मात्र दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. भडकमकर यांचे आध्यात्मिक गुरू पारनेरकर महाराज यांच्या पारनेर येथे दोन दिवसांपूर्वीच झालेल्या संगीत महोत्सवात त्यांनी मैनुद्दीन खान (जयपूर) यांना साथसंगीत केली होती.

Web Title: nashik news pramod bhadamkar death