प्रदूषणाची चाचणी न करताच पीयूसी प्रमाणपत्र

खंडू मोरे
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

खामखेडा (नाशिक): प्रत्येक वाहनाची प्रदूषणाची चाचणी करून त्याचे प्रमाणपत्र (पीयूसी) घ्यावे लागते. त्यासाठी शहरात खासगी पीयूसी केंद्र दिले आहे. प्रत्यक्षात या केंद्रावर पीयूसी मशिनमध्ये प्रदूषणाची चाचणी न करताच प्रमाणपत्र दिले जात आहे. नाशिक मधील अनेक ठिकाणच्या या पीयूसी केंद्रावर परिवहन अधिकाऱ्यांच्या डोळेझाक पणामुळे रस्त्यावर प्रदूषण करणारी वाहने चालविण्यास पूर्ण मुभा दिली जात असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे.

दुचाकी-चारचाकी वा कोणत्याही वाहनांतून रस्त्याने जाताना काळा धूर सोडला जात असला तरी त्यांच्यावर काहीच कारवाई होणार नाही असेच चित्र यावरून दिसत आहे. नाशिक शहरात खुलेआम हि केंद्र अशीच सुरु असून शहरासह जिल्ह्यातील केंद्रांवर देखील अशीच परिस्थिती असल्याने याला परिवहन विभागाची संमती असल्याचे वातावरण आहे.

रस्त्यावरील धावणारी दुचाकी वाहने तसेच रिक्षा, कार, ट्रक अशा प्रत्येक वाहनाला पीयूसीचे प्रमाणपत्र आवश्यक असते. संबंधित वाहन वायू प्रदूषण करीत नाही असा या प्रमाणपत्राचा अर्थ असतो. प्रत्येक वाहनाला दर सहा महिन्यांतून एक वेळ असे वाहन प्रदूषणमुक्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र (पीयूसी) घ्यावे लागते.पीयूसी असलेले स्टीकर वाहनांवर लावले जाते. अथवा टी पावती वहनाच्या मुल कागद पत्रांसोबत बाळगतात.वाहतूक पोलिस, आरटीओ अधिकाऱ्यांनी वाहने अडविल्यानंतर इतर कागदपत्रांबरोबरच पीयूसीही दाखवावे लागते. ग्रामीण भागात पोलिसांकडून असे प्रमाणपत्र कोणत्याही वाहनचालकाला विचारले जात नसले तरी नाशिक शहरात वाहतूक शाखेने वाहने पकडल्यानंतर तेथे हे प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक असते.

मात्र, त्यासाठी हे प्रमाणपत्र वाहने दाखवून व त्यांच्या तपासणीनंतर घेत नाहीत तर अनेक ठिकाणी पाच मिनिटात हे प्रमाणपत्र मिळत आहेत. नाशिक शहरात अनेक ठिकाणी खासगी पीयूसी केंद्र असून, अनेक ठिकाणी तर पीयूसी मोजणीचे मशिन नसतांना प्रत्यक्षात तपासणी न करताच प्रदूषणमुक्त वाहनाचे प्रमाणपत्र दिले जात आहे. वाहनाची तपासणी न करता बिनधास्तपणे हे प्रमाणपत्र दिले जाते. केवळ वाहन पेट्रोलचे आहे की डिझेलची याची विचारणा हे प्रमाणपत्र देताना केली जाते.

पीयूसी केंद्र घेणाऱ्या संस्थेला हे पीयूसी मशिन आणावे लागते. या केंद्र चालकाला प्रमाणपत्राची पुस्तके परिवहन कार्यालयातून दिली जातात. वाहनधारकांना ‘पीयूसी’ प्रमाणपत्र दिल्यानंतर ही माहिती आरटीओला द्यावी लागते. परंतु, प्रमाणपत्र देण्याची सर्व प्रक्रिया वाहनांची तपासणी न करताच केली जात असल्याचे चित्र सर्वत्र आहे.

Web Title: nashik news PUC certificate without testing of pollution