रेशन दुकानदार आजपासून संपावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

नाशिक - स्वस्त धान्य (रेशन) दुकानदारांना 40 हजार रुपये पगार देण्याच्या मागणीसाठी उद्यापासून (ता. 1) नाशिक शहर वगळता जिल्ह्यातील, तसेच राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार संपावर जाणार आहेत. उद्यापासून कोठेही धान्याची उचल केली जाणार नाही.

नाशिक जिल्ह्यात दोन हजार 450 स्वस्त धान्य दुकाने आहेत. नाशिकमध्ये 230 दुकानांचा समावेश आहे. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गजानन बाबर यांच्याशी नाशिकमधील संघटना पदाधिकाऱ्यांचे मतभेद झाल्याने दुकानदार यंदा संपात नाहीत. मात्र, जिल्ह्यातील सर्व दुकानदार संपात सहभागी होणार आहेत. राज्यभर संप सुरू असल्याने हा संप होणारच, असा दावा संघटनेने केला आहे. पॉइंट ऑफ सेल मशिन बसविले जाईल, तसेच आधारकार्डला प्रत्येक रेशनकार्ड जेव्हा जोडले जाईल तेव्हा कोणत्याही दुकानदाराला 50 ते 100 पोत्यांपेक्षा अधिक धान्य मिळणार नाही. त्यातच पूर्णपणे पारदर्शी कारभारामुळे आता दरमहा ठराविक पगार मिळाल्याशिवाय दुकान चालविणे शक्‍य होणार नसल्याने ग्रामीण भागातील दुकानदार संपावर ठाम आहेत. यापूर्वी दुकानदारांनी राजीनाम्याची तयारी दर्शविली होती. मात्र, प्रशासनाने त्यावर निर्णय घेतला नाही.

Web Title: nashik news ration shopkeeper strike