प्रादेशिक परिवहन कार्यालय-महापालिकेत जुंपली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

पंचवटी - पेठ रोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात कचरा जाळल्याप्रकरणी महापालिकेने आरटीओला नोटीस बजावली. प्रत्युत्तरादाखल महापालिकेच्या अनेक वाहनांच्या काचांवर काळ्या फिल्म लावल्याने नियमाचा भंग होत असल्याचा ठपका ठेवत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने महापालिकेला नोटीस बजावत काचेवरील फिल्म काढून वाहन आरटीओ कार्यालयात तपासणीसाठी सादर करण्याचे आदेश दिले. या प्रकरणामुळे उभय कार्यालयांत जुंपली आहे.  

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात काल (ता. २१) मोठ्या प्रमाणावर कचरा जाळल्यावर धुराचे लोट दिसू लागले. या घटनेला आग समजून परिसरातील काहींनी महापालिका अग्निशामक दलाला दूरध्वनी करून माहिती दिली. अग्निशामक दलाच्या बंबांनी दाखल होऊन कचऱ्याची आग विझवली. ही घटना महापालिका स्वच्छता विभागाचे अधिकारी संजय गोसावी यांना कळताच ते त्या ठिकाणी दाखल झाले. प्रदूषण रोखण्यासाठी राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने कचरा जाळण्यावर कडक निर्बंध घातले आहेत. याशिवाय कचरा जाळणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईचे आदेशही दिले आहेत. तरीही कचरा जाळल्याने त्यांनी आरटीओला दंडात्मक कारवाईसाठी नोटीस बजावली. 

या घटनेचा राग मनात धरून महापालिकेच्या मालकीच्या गाड्यांच्या काचांना काळ्या फिल्म लावल्याचे कारण देत आरटीओने आज संबंधित चालकाकडे नोटिसा सोपवल्या. मखमलाबाद नाक्‍यावरील महापालिकेच्या मालकीचे भांडार असून, याठिकाणी गाड्यांची दुरुस्ती केली जाते. या ठिकाणी जाऊन संबंधितांना काचेवरील काळ्या फिल्म काढून वाहने आरटीओ कार्यालयात तपासणीसाठी आणण्याचे आदेश दिले. महपालिकेच्या मालकीच्या तीन गाड्यांना अशा नोटिसा दिल्या.

Web Title: nashik news rto municipal corporation