लोकांपर्यंत जा, त्यांना आपले करा - संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

नाशिक रोड -  सुरवातीला नागरिक आपल्यापर्यंत येत होते. आता शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोचले पाहिजे. त्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करा. पक्षाबद्दल आपुलकी निर्माण करा, असे आवाहन शिवसेना उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख, खासदार संजय राऊत यांनी केले. 

नाशिक रोड -  सुरवातीला नागरिक आपल्यापर्यंत येत होते. आता शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोचले पाहिजे. त्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करा. पक्षाबद्दल आपुलकी निर्माण करा, असे आवाहन शिवसेना उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख, खासदार संजय राऊत यांनी केले. 

येथे नाशिक पूर्व विधानसभेच्या शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा संपर्कप्रमुख अजय चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, व्यापारी बॅंकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, नगरसेवक सुधाकर बडगुजर, चंद्रकांत लवटे, शिवाजी सहाणे, नगरसेविका सुनीता कोठुळे, जयश्री खर्जुल, ज्योती खोले, माजी महापौर नयना घोलप, भगूरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे, नगरसेवक रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, शिवाजी भोर, शिरीष लवटे, श्‍याम खोले प्रमुख पाहुणे होते. 

खासदार राऊत म्हणाले, की तरुणांना राजकारणाचे आकर्षण आहे. युवासेनेत जास्तीत जास्त तरुणांना सहभागी करून घेऊन त्यांना पदे, जबाबदारी द्या. आजचा तरुण वृत्तपत्र कमी वाचतो. मात्र, सोशल मीडियावरील मेसेस जास्त पाहतो. शिवसेनेच्या अंगिकृत संघटनांच्या शाखा सुरू करा. त्यामार्फत लोकांची कामे करा. नवीन मतदारांना पक्षाचे कार्य समजून सांगा. शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघात कार्यकर्त्यांना पदे देऊन कामाला लावा. एकही पद रिकामे राहता कामा नये. जास्तीत जास्त महिलांचा सहभाग यापुढे दिसला पाहिजे. पक्षात गद्दारांना स्थान दिले जाणार नाही. पूर्वी आपल्याकडे बघण्याची हिंमत नव्हती. ते आता आपल्याला शहाणपण शिकवत आहेत. जेथे शिवसेनेचा आमदार आहे, त्या मतदारसंघात घोलपांच्या कन्येचा पराभव होतो, ही नामुष्की आहे. त्यामुळे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. 

कार्य करीत राहा; तुमचे स्वप्न पूर्ण होईल, असे सल्ला त्यांनी चंद्रकांत लवटे यांना दिला. संदेश लवटे, विकास गिते, किरण डहाळे, चंदू महानुभव, अमोल निकम, योगेश शिंदे, स्वप्नील औटे यांनी संयोजन केले. 

आम्ही चुका सुधारू - नयना घोलप 
माजी महापौर नयना घोलप म्हणाल्या, की माझा पराभव हेतुपुरस्सर घडवून आणला. दोन्ही प्रभागांत चारपैकी तीन नगरसेवक शिवसेनेचे निवडून येतात. फक्त घोलपांच्या कन्येचाच पराभव होतो. आमचे काही चुकले असेल, तर समक्ष भेटून सांगा. आम्ही झालेल्या चुका सुधारू. 

Web Title: nashik news sanjay raut shiv sena