'कपटी भाजपचा सावधपणे करू पाडाव '

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

नाशिक रोड - आपल्यासमोर भाजप कपटी शत्रू आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे आपण पानिपत करू शकतो. मात्र, भाजपचा पराभव करताना खूप काळजी घ्यावी लागेल. आपण सावधपणे लढूनच त्यांचा पाडाव करायला हवा. त्यांच्याकडे सत्ता, संघटना व आर्थिक पाठबळ मोठे आहे. भाजपचा पराभव बाळासाहेबांना मानवंदना ठरेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख, खासदार संजय राऊत यांनी केले. 

नाशिक रोड - आपल्यासमोर भाजप कपटी शत्रू आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे आपण पानिपत करू शकतो. मात्र, भाजपचा पराभव करताना खूप काळजी घ्यावी लागेल. आपण सावधपणे लढूनच त्यांचा पाडाव करायला हवा. त्यांच्याकडे सत्ता, संघटना व आर्थिक पाठबळ मोठे आहे. भाजपचा पराभव बाळासाहेबांना मानवंदना ठरेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख, खासदार संजय राऊत यांनी केले. 

येथे झालेल्या आजी- माजी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हा संपर्कप्रमुख अजय चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, आमदार योगेश घोलप, व्यापारी बॅंकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, जगन आगळे, सुनीता कोठुळे, नगरसेवक केशव पोरजे, शिवाजी सहाणे, माजी महापौर नयना घोलप, जयश्री खर्जुल, भगूरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल ताजनपुरे, तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, हरी गायकर, जिल्हा परिषद सदस्या उज्ज्वला जाधव, डॉ. मंगेश सोनवणे, राजू लवटे, रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, अनिल जगताप, सुदाम डेमसे प्रमुख पाहुणे होते. 

श्री. राऊत म्हणाले, की शिवसेनेचा ज्वालामुखी आपल्याला भस्मसात करेल, अशी भीती भाजपला सतत वाटते. आपली ताकद दिसतेय म्हणूनच ते आपल्याला संपवू पाहत आहेत. महाराष्ट्राचे राजकारण वेगाने बदलत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज शिवसेनेला आव्हान देत आहेत. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन फक्त उत्तर महाराष्ट्राच्या ताकदीवरच होणार आहे. नाशिक शिवशाहीचे गेट वे आहे. 

प्रमोद आडके यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. नितीन चिडे, राजेश फोकणे, योगेश देशमुख, गोरख खर्जुल, नितीन खर्जुल, मंदा गवळी, लीलाबाई गायधनी, अंबादास ताजनपुरे, लकी जगताप, चंदू महानुभव, किरण डहाळे, नवनाथ गायधनी आदींनी संयोजन केले. 

बालेकिल्ला जपण्यासाठी आत्मपरीक्षणाची गरज 
देवळाली मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असला, तरी सावधपणे काम करावे. बालेकिल्ले प्रथम जपावेत, असे छत्रपती शिवाजी महाराजांचे सूत्र होते. महाराजांनी बालेकिल्ले जाऊ दिले नाहीत म्हणून स्वराज्य निर्माण झाले आणि वाढले. शिवसेना महापालिकेत बहुमत मिळवू शकली नाही. या बालेकिल्ल्यात सत्ता का गेली? संघटन व माणसे यांच्यात दोष आहे. त्याचे आत्मपरीक्षण गरजेचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधा. त्यांच्या भावना जाणून घ्या. विधानसभा, महापालिकेची तयारी आतापासूनच करा, असा सल्ला श्री. राऊत यांनी बबनराव घोलप यांना दिला. 

Web Title: nashik news sanjay raut shiv sena bjp