सप्तश्रृंगी गडावरील भगवती मंदिर सात दिवसांसाठी बंद

दिगंबर पाटोळे
सोमवार, 19 जून 2017

वणी (नाशिक): साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तश्रृंगी गडावरील भगवती मंदिराच्या शिखरावर दरड प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी श्री भगवतीचे मंदीर बुधवार (ता. 21) पासून सलग सात दिवसांसाठी भाविकांच्या सुरक्षितेसाठी बंद राहाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने देण्यात आली आहे

सप्तश्रृंगी गडावर भगवती मंदीर परीसरात १२ जुन रोजी दरड कोसळण्याची घटना घडली होती. यात कोसळलेला दरड ‘रॉकफॉल बॅरिअर’ ने झेलल्याने कोणत्याही प्रकारची जिवीत वा वित्त हाणी झाली नाही. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व डोंगरास दरड प्रतिंबधक लोखंडी जाळीचे आवरण करणारी मॅकाफेरी एनव्हॉयर्नमेंटल सोल्युशन्स या मल्टिनॅशनल कंपनीच्या तंत्रज्ञांनी घटनास्थळाची पाहाणी करुन पडलेले दरड उतरविण्यासाठी व दरड प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याचे काम तातडीने हाती घेतले आहे. त्यासाठी स्पेन सह उत्तराखंडातून काही तंत्रज्ञ व प्रशिक्षित कामगारांची रेस्क्यु टीम येत असून सदर कामासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

सदरचे काम उंचावरील असल्याने जिवित व वित्तहाणीचा शक्यता असल्याने सुरक्षीतेच्या कारणास्तव भाविक, गावकरी व पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी मंदीर बुधवार ता. २१ ते २७ जुन या दरम्यान बंद राहाणार आहे. याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने भाविक, पर्यटक व नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून सर्व प्रशासकीय यंत्रणा, राज्य परिवहन महामंडळ, सप्तश्रृंगी देवी संस्थान, सप्तश्रृंगी गड न नंादुरी ग्रामपंचायत यांना कळविण्यात आली आहे.

Web Title: nashik news saptashrungi devi vani