पाच जॉगिंग ट्रॅकवर शेअरिंग सायकल उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नाशिक - टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस व महापालिकेतर्फे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर राबविलेल्या शेअरिंग सायकल उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शहरातील आणखी पाच जॉगिंग ट्रॅकवर सायकल शेअरिंग स्टॅण्ड उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

शहराचा विस्तार वाढत असताना हवा, ध्वनिप्रदूषण व वाहतुकीचे प्रश्‍न निर्माण होत असल्याने एप्रिलपासून शेअरिंग सायकल उपक्रम राबविला जात आहे. स्टार्टअप इंडियांतर्गत पेडल टिमने सायकल शेअरिंगचा आराखडा तयार केला आहे. स्मार्टसिटी साकारताना रस्त्यांवर सायकलसाठी स्वतंत्र ट्रॅकची निर्मिती केली जाणार असल्याने त्यासाठी शेअरिंग सायकल उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. एप्रिलपासून उपक्रमाला सुरवात झाली. पहिल्या टप्प्यामध्ये सहा सायकल उपलब्ध करून दिल्या होत्या. 

आतापर्यंत चारशे नागरिकांनी शेअरिंग सायकलसाठी नोंदणी केली आहे. त्यांना स्वाइपकार्ड दिले आहेत. पहिल्या अर्धा तासासाठी दहा रुपये, तर त्यापुढे ठराविक दर आकारले जातात. शहरात सायकल कुठल्या मार्गावर आहेत, सायकलचे लोकेशन मोबाईलवर उपलब्ध असते. वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन शेअरिंग सायकलची आणखी पाच केंद्रे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

येथे होणार केंद्रे
कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, आकाशवाणी टॉवरजवळील कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, गोविंदनगर, इंदिरानगर येथे सायकल शेअरिंगची केंद्रे होणार आहेत. येथे पाच सायकल केंद्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आणखी एक केंद्र तयार केले जाणार आहे. महापालिकेमार्फत सायकल शेअरिंगसाठी प्रायोजक शोधले जात आहेत.

Web Title: nashik news sharing cycle on five jogging track