नालेसफाई चौकशी समितीबाबत शिवसेना विचारणार जाब

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

नाशिक - महासभेत पावसाळीपूर्व कामांबाबत सदस्यांच्या शंकांना उत्तर न देताच गोंधळाचे कारण देत महापौर रंजना भानसी यांनी सभा गुंडाळत अधिकाऱ्यांना पाठीशी घातले होते. त्यानंतर विरोधकांचा रोष बघता तातडीने दुसऱ्या दिवशी नालेसफाईच्या कामांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची घोषणा केली. समिती फक्त घोषणेपुरतीच मर्यादित राहिल्याने शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडण्यासाठी जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते त्यासंदर्भात महापौरांना पत्र देणार असून, समितीचे स्वरूप विचारणार आहेत.

मुसळधार पावसाने गेल्या आठवड्यात शहराची दैना उडाली होती. पावसाळीपूर्व कामांवर महापालिकेने खर्च केलेले सुमारे अडीच कोटी रुपये वाया गेल्याची भावना व्यक्त करत नगरसेवकांनी सोमवारच्या महासभेत प्रशासनाला धारेवर धरले होते. प्रशासनाकडून उत्तर मिळण्याची वेळ आली असतानाच सभागृहनेते दिनकर पाटील यांनी पावसाळी योजनेच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षातील सदस्यांच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यामुळे नालेसफाईच्या कामावरून सुरू झालेली चर्चा पावसाळी गटार योजनेकडे वळत विरोधकांनी खुलासा करण्याची मागणी करत गोंधळ घातला होता. महापौर रंजना भानसी यांनी गोंधळातच सभा आटोपल्याने त्यांच्यावर प्रशासनाला पाठीशी घातल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे तातडीने दुसऱ्या दिवशी त्यांनी नालेसफाईच्या कामांची चौकशी करण्याची घोषणा केली होती. परंतु समिती कशी असणार, त्यात कोणाचा समावेश असेल, याबाबत मात्र स्पष्ट केले नाही. घोषणा होऊन दोन दिवस उलटले तरी त्याबाबत वाच्यता होत नसल्याने महापौरांकडून प्रसिद्धीचा स्टंट झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महापौरांना पत्र लिहून याबाबत विचारणार आहे. महापौरांचे प्रथम अभिनंदन करून समितीच्या रचनेबाबत विचारणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘नो अवर ॲप’ येणार कामी
माजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापालिकेच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी ‘नो अवर ॲप’ विकसित केले होते. या ॲप्लिकेशनमध्ये नागरिकांना कामांबाबत सविस्तर माहिती व कामांची प्रगती समजण्याची व्यवस्था आहे. ॲप्लिकेशनमध्ये झालेल्या कामांचे फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे. नालेसफाईच्या कामांचे फोटो अपलोड केले का, याची तपासणी करण्याचे आवाहन महापौर भानसी यांना केले जाणार आहे.

Web Title: nashik news Shiv Sena will ask about dranage cleaning inquiry committee