सोशल नेटवर्किंग फोरमच्या जल अभियानात सातवे गाव टॅंकरमुक्त 

सोशल नेटवर्किंग फोरमच्या जल अभियानात सातवे गाव टॅंकरमुक्त 

नाशिक - सोशल नेटवर्किंग फोरमच्या गेल्या वर्षी सुरू केलेल्या जल अभियान उपक्रमांतर्गत स्पार्टन हेल्थ सेंटर, नाशिक डॉक्‍टर्स, फेसबुक सोशल नेटवर्कर्स व पाणी व्हॉट्‌सऍप ग्रुप यांच्या सहकार्याने वडपाडा (ता. पेठ) या अतिदुर्गम पाड्यावर मोफत पाणीपुरवठा योजनेचे नुकतेच लोकार्पण झाले. फोरमने विकसित केलेल्या एसएनएफ पद्धती अंतर्गत पाण्यासाठी स्वयंपूर्ण झालेले हे सातवे गाव आहे. 

वडपाड्यातील सामाजिक पाणी योजनेचे लोकार्पण गावातील कष्टकरी माहिलांच्या हस्ते झाले. प्रारंभी पाण्याच्या टाकीतील पाण्याचा विसर्ग करून लोकार्पण केले गेले. सोशल नेटवर्किंग फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी उपक्रमाचा हेतू सांगितला. सरपंच सुरेश दहावाड यांनी योजनेच्या पुढील देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी घेतली. डॉ. ए. के. पवार यांनी पाण्याच्या सुविधेचा ग्रामस्थानी चांगला वापर करण्याचे आवाहन केले. 

सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंके, पोलिस उपनिरीक्षक घुगे, डॉ. माधवी मुठाळ, डॉ. सरला सोहनंदानी, राहुल कदम, संतोष कोठावळे आदी उपस्थित होते. फोरमचे समन्वयक रामदास शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत बच्छाव यांनी आभार मानले. यापूर्वी गढईपाडा, तोरंगण, शेवखंडी, फणसपाडा, खोटरेपाडा, माळेगाव ही गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहेत. 

असा आहे "एसएनएफ' पॅटर्न 
गावोगाव अर्धवट अवस्थेत पडून असलेल्या पाणी योजनांची पाहणी करून योजनेच्या अपयशाची कारणे या पद्धतीत शोधली जातात. तज्ज्ञांच्या सहकार्याने समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. शेवटी लोकसहभागातून आर्थिक निधी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि ग्रामस्थांचे श्रमदान या त्रिसूत्रीवर आधारित गावचा पाणीप्रश्‍न सोडवला जातो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com