सोनोग्राफी सेंटरमध्येच महिलेची प्रसूती; कन्यारत्नाला जन्म

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

जुने नाशिक - डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेस रुग्णालयात सोनोग्राफी सुविधा नसल्याने पिंझरघाट येथील महेबूब सुब्हानी ट्रस्टच्या धर्मार्थ सोनोग्राफी सेंटरमध्ये नेले, मात्र त्याच वेळी महिला प्रसूत होऊन तिने कन्यारत्नाला जन्म दिला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सेंटरमध्ये धावपळ उडाली. सेंटरमधील कर्मचारी, तसेच परिसरातील खासगी रुग्णालयातून परिचारिकेला बोलवून महिलेवर प्राथमिक उपचार करण्यात आले. वडाळा गाव येथील जाहिद तौसिफ शेख यांना प्रसूतिवेदना जाणवू लागल्याने त्यांना डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दाखल केले.

जुने नाशिक - डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेस रुग्णालयात सोनोग्राफी सुविधा नसल्याने पिंझरघाट येथील महेबूब सुब्हानी ट्रस्टच्या धर्मार्थ सोनोग्राफी सेंटरमध्ये नेले, मात्र त्याच वेळी महिला प्रसूत होऊन तिने कन्यारत्नाला जन्म दिला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सेंटरमध्ये धावपळ उडाली. सेंटरमधील कर्मचारी, तसेच परिसरातील खासगी रुग्णालयातून परिचारिकेला बोलवून महिलेवर प्राथमिक उपचार करण्यात आले. वडाळा गाव येथील जाहिद तौसिफ शेख यांना प्रसूतिवेदना जाणवू लागल्याने त्यांना डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दाखल केले. त्या वेळी डॉक्‍टरांनी त्यांची तपासणी करत त्यांना सोनोग्राफीचा सल्ला दिला. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा नसल्याने महिला पिंझरघाट येथील महेबूब सुब्हानी ट्रस्टच्या धर्मार्थ सोनोग्राफी सेंटरमध्ये गेली. त्या ठिकाणी डॉक्‍टरांची वाट पाहत बसली असताना अचानक महिलेस त्रास जाणवू लागला.

 सेंटरच्या महिला कर्मचाऱ्याने डॉक्‍टरांना माहिती दिली. तोपर्यंत महिलेस सोनोग्राफी कक्षात झोपविण्यात आले. डॉक्‍टर अर्ध्या रस्त्यात असताना महिलेच्या प्रसूतिवेदना वाढल्या व काही वेळातच महिलेची प्रसूती झाली. अचानक घडलेल्या प्रकाराने सेंटरमधील परिचारिकेसह इतर कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. प्रसूतीनंतर ट्रस्टचे अध्यक्ष अलिम पीरजादे व मकसूद शेख यांनी ट्रस्टच्या रुग्णवाहिकेतून महिलेस पुढील उपचारासाठी डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दाखल केले. बाळ-बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत.

Web Title: nashik news Sonography Centres

टॅग्स