नाशिक विभाग एसटी नियंत्रकपदी नितीन मैंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

नाशिक - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे राज्यातील 15 विभाग नियंत्रकांच्या बदल्या केल्या आहेत. यामिनी जोशी यांच्याकडे पुणे विभागाची, तर नगरचे नितीन मैंद यांच्याकडे नाशिक विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

बदली करण्यात आलेल्या विभाग नियंत्रकांकडे देण्यात आलेले विभाग असे - पुण्याचे श्रीनिवास जोशी- मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवशाही बससेवा कक्ष, यवतमाळचे अशोक वरठे- नागपूर, रत्नागिरीच्या अनघा बारटक्के- रायगड, सिंधुदुर्गचे चेतन हासबनीस- पुण्याची द्वितीय आवेदन समिती, जळगावच्या चेतना खिरवाडकर- वर्धा, औरंगाबादचे राजेंद्र पाटील- चंद्रपूर, बुलडाण्याचे अनिल म्हेत्तर- रत्नागिरी, धुळेचे राजेंद्र देवरे- जळगाव, साताराच्या अमृता ताम्हणकर- सांगली, सांगलीचे शैलेंद्र चव्हाण- ठाणे, जालनाचे प्रशांत भुसारी- औरंगाबाद, रायगडचे विजय गिते-नगर, अकोलाचे रोहन पलंगे- कोल्हापूर. यामधील चव्हाण, मैंद, भुसारी, गिते, पलंगे, श्रीमती ताम्हणकर यांची विनंती बदली करण्यात आली आहे. हासबनीस यांना उपमहाव्यवस्थापक पदाच्या बदल्यात बदली देण्यात आली आहे.

Web Title: nashik news st controller nitin maid