राज्य नाट्य स्पर्धेचा पडदा आज उघडणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

नाशिक - सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे होणाऱ्या ५७ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धांना उद्यापासून (ता. ६) सुरू होणार आहे. सायंकाळी सहाला परशुराम साईखेडकर नाट्यगृहात मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे कार्यवाह दीपक करंजीकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन होणार आहे.

नाट्यलेखक दत्ता पाटील, ज्येष्ठ अभिनेते अरुण गिते प्रमुख पाहुणे राहतील, अशी माहिती स्पर्धेचे समन्वयक राजेश जाधव यांनी दिली. 

राज्य नाट्य स्पर्धेत २१ नाटके सादर होणार आहेत. ही नाटके परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रोज सायंकाळी सातला सादर होणार आहेत. रोज एक नाटक सादर होणार असून, २४ आणि २५ नोव्हेंबरला दोन नाटके सादर होतील. यापैकी एक सकाळी साडेअकराला व दुसरे सायंकाळी सातला सादर होईल. उद्या (ता. ६) विजय नाट्य मंडळाचे नेताजी भोईरलिखित, दिग्दर्शित ‘हे रंग जीवनाचे’ नाटकाने स्पर्धेला सुरवात होईल. नेताजी भोईर यांची ५० वी राज्य नाट्य स्पर्धा आहे. त्यांचा या वेळी सन्मानही करण्यात येणार आहे. त्यानंतर ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘रक्तबीज’, ‘रातम तारा’, ‘श्‍यामची आई आणि धम्म...’, ‘सती न गेलेली महासती’, ‘पोशा’, ‘प्रयास’, ‘ऐडिपस रेक्‍स’, ‘वंशभेद’, ‘तितीक्षा’, ‘ये मामला गडबड है’, ‘ती रात्र’, ‘ॲनिमल प्लॅनेट’, ‘नाव झालं पाहिजे’, ‘छक्के पंजे’, ‘एक्‍झिट’, ‘मून विदाउट स्काय’, ‘उत्तरदायित्व’, ‘चाहूल’ ही नाटके अनुक्रमे सादर होणार आहेत. त्यामुळे ही स्पर्धा म्हणजे नाट्यरसिकांना पर्वणीच ठरणार आहे.

Web Title: nashik news state drama competition