दोन चिमुकल्यांसह आईचा संशयास्पद मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

नाशिक - ठाणापाडा (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे एका महिलेसह तिच्या दोन चिमुकल्यांचे मृतदेह राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. हा प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप करत जमिनीच्या वादातून त्यांचा खून केल्याचा संशय मृत महिलेच्या पित्याने व्यक्त केला आहे. दरम्यान, संबंधित महिलेच्या पतीने चार महिन्यांपूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी हरसूल पोलिसात नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदन अहवालानंतरच चित्र स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. 

ठाणापाडा येथे हौशाबाई गिरीधर लोखंडे (वय 36) या मुलगा नीरज (वय 12) व मुलगी माधुरी (वय 10) यांच्यासह राहत होत्या. त्यांचे पती गिरीधर लोखंडे यांनी चार महिन्यांपूर्वीच आत्महत्या केली आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास घराच्या लाकडी वाशाला नायलॉनची दोरी बांधून हौशाबाई, नीरज व माधुरी यांचे मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत मृत आढळले. एकाच कुटुंबातील तिघांच्या संशयास्पद आत्महत्येची माहिती मिळताच हरसूलचे पोलिस निरीक्षक एम. बी. घुगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मृत महिलेचे वडील जयराम बाळू धनवले (रा. चिखलपाडा, दलपतपूर, ता. त्र्यंबकेश्‍वर) यांना देण्यात आली.

Web Title: nashik news Suspicious death