स्वाइन फ्लूने घेतले आतापर्यंत १३ बळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

नाशिक - ऐन सणासुदीच्या काळात शहरात स्वाइन फ्लू व डेंगीने थैमान घातले असून, स्वाइन फ्लूने आतापर्यंत १३ बळी गेले, तर आठ महिन्यांत २९ रुग्णांना लागण झाली आहे. स्वाइन फ्लूपाठोपाठ डेंगी आजार वाढला असून, १ जानेवारी ते २८ ऑगस्ट या कालावधीत एकूण १२८ रुग्णांपैकी ऑगस्ट महिन्यातच ७४ डेंगीचे रुग्ण आढळले आहेत.

पावसाळ्यात दरवर्षी स्वाइन फ्लू व डेंगीचे रुग्ण वाढतात. या वर्षी जून व जुलैत रुग्णांची संख्या वाढली नाही. परंतु ऑगस्ट महिन्यात मात्र दोन्ही आजाराने कहर केला आहे. विशेष म्हणजे, गणेशोत्सव काळात अधिक रुग्ण वाढताना दिसत आहेत. १ जानेवारी ते २८ ऑगस्ट या कालावधीमध्ये शहरात स्वाइन फ्लूचे ४७ रुग्ण आढळले असून, यापैकी चार जणांचा बळी गेला आहे. तर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या ३९ असून, त्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान वाढत्या स्वाइन फ्लूमुळे कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बंद पडलेला स्वाइन फ्लू कक्ष पुन्हा सुरू करण्यात आला आहे. कक्षाकरिता तीन वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वाइन फ्लूपाठोपाठ डेंगीचे रुग्ण वाढत आहेत.

Web Title: nashik news swine flu

टॅग्स