स्वाइन फ्लू, डेंगीचे नाशिक शहरात वाढले रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

नाशिक - शहरात स्वाइन फ्लू, डेंगीबरोबरच तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार माहिती समोर आली आहे. तापाचे दोन हजारांवर रुग्ण आढळले आहेत.

नाशिक - शहरात स्वाइन फ्लू, डेंगीबरोबरच तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार माहिती समोर आली आहे. तापाचे दोन हजारांवर रुग्ण आढळले आहेत.

जुलैमध्ये तापाचे दोन हजार ५९ रुग्ण, पंधरा दिवसांत अतिसाराचे ७५५ रुग्ण, काविळीचे आठ व विषमज्वराचे ४८ रुग्ण आढळले. शहरात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कायम आहे. जानेवारी ते १८ जुलैदरम्यान १९४  जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. यात शहरात जानेवारी ते अठरा जुलैअखेरपर्यंत स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्यांची संख्या २८ वर पोचली आहे. जुलैमध्ये स्वाइन फ्लूचे सोळा नवे रुग्ण आढळले. यात महापालिका हद्दीतील पाच, तर शहराबाहेरील अकरा रुग्णांचा समावेश आहे. स्वाइन फ्लूपाठोपाठ शहरात जानेवारी ते १८ जुलैदरम्यान ५४ रुग्णांना डेंगीची लागण झाली. जुलैतच डेंगीचे १४ नवे रुग्ण आढळले. महापालिकेतर्फे शहरात डेंगी जनजागरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Web Title: nashik news swine flu, dengue patine increase in nashi city