कला-कार्यानुभव हस्तकला उपक्रमाच्या स्टॉलवर शिक्षकांची गर्दी

खंडू मोरे
बुधवार, 31 जानेवारी 2018

प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमातील कलेतून शिक्षण,कलेचे शिक्षण आणि कला हेच शिक्षण ही त्रिसूत्री जोपासत सुनिल मोरे पुनर्वापर निसर्ग साधन संपत्तीचा-मंत्र पर्यावरण रक्षणाचा हा पर्यावरणस्नेही मंत्र आपल्या कलाकृतींमार्फत सर्वांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी होतांना दिसत आहेत.
- डॉ वैशाली झनकर, शिक्षणाधिकारी जि.प.नाशिक.

खामखेडा (नाशिक): राज्यातील शैक्षणिक उपक्रमांची माहिती व परिणामकारकता सर्वांना अनुभवता यावी म्हणून नाशिक येथे सध्या शिक्षणाची वारी हा कार्यक्रम सुरू आहे. शालेत शिक्षण विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमात विविध प्रकारचे एकूण ५४ स्टॉल्स असून त्यातील एक आगळा-वेगळा स्टॉल म्हणून कला-कार्यानुभव अंतर्गत पर्यावरणस्नेही हस्तकला उपक्रम नारळाच्या टाकाऊ करवंटीपासून कलाकृती निर्मितीचा स्टॉल वरती शिक्षकांची गर्दी उसळत आहे.

जि. प.शाळा चुडाणे (ता. शिंदखेडा जिल्हा धुळे) येथील सुनिल मोरे या प्राथमिक शिक्षकाने नारळाच्या टाकाऊ भागामध्ये सौंदर्य शोधून फेकून, टाकून दिलेल्या नारळाच्या करवंटीपासून अप्रतिम कलाकृतींचा आविष्कार घडून सर्वांना अचंबित केले आहे.

निसर्ग आपणास सदैव काहीतरी देतो नव्हे आपण घेतो मात्र त्या बदल्यात निसर्गास आपण काय देतो तर प्लास्टिक रुपी कचरा,आणि प्रदूषण वाढवितो.या निसर्गाशी, पर्यावरणाशी आपले नाते कसे घट्ट होईल, पर्यावरण रक्षणासाठी आपणास काय करता येईल असा चिकित्सक विचार सुनिल मोरे या धेय्यवेड्या शिक्षकाने १० वर्षांपूर्वी केला आणि 'पुनर्वापर निसर्ग साधन संपत्तीचा-मंत्र पर्यावरण रक्षणाचा' हे सूत्र त्यांना गवसले आणि नारळाच्या टाकाऊ करवंटी पासून त्यांनी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न घेता केवळ स्वयंप्रेरणेने एक छंद म्हणून करवंटी पासून कलाकृती निर्मितीचा छंद जोपासला आहे.

नारळाच्या झाडाला निसर्गातील कल्पवृक्ष म्हणतात कारण त्याची कोणतीही वस्तू वाया जात नाही मग त्याची करवंटी का टाकाऊ,निरुपयोगी म्हणून फेकून द्यावी असा प्रश्न पडून त्यांनी करवंटी पासून कलाकृती निर्मिती करून नारळाच्या झाडाचे कल्पवृक्षत्व सिद्ध करण्याचा हा आविष्कार केला आहे.देवाला जातांना आपण भाविक नारळ घेऊन जातो आणि देवाला फोडतो मात्र पुढे त्याच करवंट्या कचऱ्यात,गटारीत पडलेल्या आपणास दिसतात आणि प्रदूषण वाढते मात्र सुनिल मोरे हे अशा पडलेल्या करवंट्या गोळा करून त्यापासून कलाकृती साकारतात हे विशेष आहे.गेल्या १० वर्षात मिळणाऱ्या फावल्या वेळेचा सदुपयोग करून विविध प्रकारच्या सुमारे ७०० कलाकृती तयार केल्या असून शाळा,महाविद्यालय,शिक्षण महोत्सव अशा ठिकाणी प्रदर्शने भरविली आहेत.

आपल्यासह इतरांना ही ही कला अवगत व्हावी म्हणून ते प्रयत्नशील असून आतार्यंत शेकडो कलप्रेमींना याबाबत प्रशिक्षण ही दिले आहे. कला-कार्यानुभवाच्या तासिकेत त्यांच्या विध्यार्थ्यांना देखील त्यांनी करवंटी कशी कापावी,घासावी याचे मार्गदर्शन दिले असून त्यांचे विद्यार्थीदेखील कलाकृती साकारतात.आपल्या या हस्तकलेच्या बाबत स्वतः त्यांनी कोणताही व्यवसायिक दृष्टिकोन ठेवलेला नाही मात्र यातून रोजगार निर्मिती होऊ शकते असा दृढ विश्वास त्यांना आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात आपला विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.त्यांचा हा हस्तकलेचा स्टॉल शिक्षण वारीत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे हे महत्वाचे.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :
भाजपा म्हणते, राहुल गांधींचे जॅकेट 70 हजारांचे
आई-बाबा सांगा ना, आमची काय चूक...​
मृत तरुणी परत आल्याच्या अफवेने गोंधळ​
"हे राम' म्हटल्याबद्दलच्या विधानाचा विपर्यास​
सरकारी कर्मचाऱ्यांना रविवारी रजा नको; न्यायालयाची सूचना​
विकासवृद्धीसाठी झेपावे निर्यातीकडे!​

श्रीमंत देशांत भारत सहावा; अमेरिका प्रथम
तनिष्कने केली 1045 धावांची नाबाद विश्‍वविक्रमी खेळी​
दोषींवर कडक कारवाई करू; आदित्यनाथ यांनी मौन सोडले​

Web Title: nashik news teacher art and crafts stall