शिक्षकांच्या बदल्यासंदर्भातील सर्व याचिका फेटाळल्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

इगतपुरी - राज्य शासनाच्या जिल्हा परिषदांतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भातील 27 फेब्रुवारी 2017 च्या शासननिर्णयास आव्हान देणाऱ्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. अनुप मोहता आणि न्या. सुनील कोतवाल यांनी फेटाळल्या आहेत. त्यामुळे 27 फेब्रुवारी 2017 चा शासन निर्णय कायम राहिला आहे. 

या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांच्यासह जवळपास 20 याचिका खंडपीठात दाखल झाल्या होत्या. जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने 27 फेब्रुवारी 2017 रोजी बदल्यांचे नवे धोरण जाहीर केले. त्यानुसार शासनाने अवघड क्षेत्र आणि सर्वसाधारण क्षेत्र, असे दोन क्षेत्र निर्माण केले. हे क्षेत्र ठरविण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आला. तसेच यामध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग- 1 आणि भाग- 2 हे निर्माण करण्यात आले आणि त्यामध्ये प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. 

हा शासनादेश बेकायदेशीर आहे. नवीन धोरणानुसार दरवर्षी बदलीचे प्रमाण किती टक्के असावे, या बाबत सुस्पष्टता नाही. त्यामुळे 90 टक्‍क्‍यांहून अधिक प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या दरवर्षी होतील आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या शिक्षण क्षेत्रावर विपरीत परिणाम होईल, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.

Web Title: nashik news teacher trasnfer issue