द्वारका सर्कलवरील वाहतूक वळविणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

नाशिक - द्वारका सर्कलवर वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकेरी वाहतूक केली जाणार आहे. त्यासंदर्भात महापालिकेने पोलिसांकडे प्रस्ताव दिला असून, आठ दिवसांत एकेरी मार्ग होणार आहे. नाशिकहून नाशिक रोडकडे जाताना द्वारका सर्कलला वळसा घालण्याऐवजी वाहनधारकांना थेट ट्रॅक्‍टर हाउसपर्यंत जावे लागणार आहे. टाकळी रोडला जायचे झाल्यास उजव्या हाताला वळून जाता येईल. 

नाशिक-पुणे महामार्गावर जाण्यासाठी सर्व्हिस रोड किंवा महामार्गावरून द्वारका सर्कलवरून डाव्या हाताला वळावे लागणार आहे. नाशिक रोडहून नाशिकला जायचे झाल्यास द्वारका सर्कलला वळसा घालता येणार नाही. महामार्गावरील वडाळा नाका सिग्नलवरून वळावे लागेल.

Web Title: nashik news traffic

टॅग्स