त्र्यंबकेश्‍वर नगराध्यक्षांविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

तेरा नगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; विकास आराखड्यात घुसखोरी भोवली 

नाशिक - त्र्यंबकेश्‍वरच्या नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांच्या एककल्ली कारभाराला विरोध दर्शवत १३ नगरसेवकांनी त्यांच्यावर अविश्‍वास दाखविला असून, जिल्हाधिकाऱ्यांना आज पत्र देत अविश्‍वास प्रस्तावाची बैठक बोलाविण्याची मागणी केली आहे. भाजपच्या नगराध्यक्षांवर अविश्‍वासासाठी गटनेत्यांसह भाजप नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. 

त्र्यंबकेश्‍वरचा विकास आराखडा करताना नगराध्यक्षांनी परस्पर अनेक जमिनी पिवळ्या पट्ट्यात रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला. नगराध्यक्षा रजेवर गेल्यानंतर त्यांच्या पतीने परस्पर शासकीय मुद्रणालयाला आराखडा छापण्यासाठी पत्र दिले. शासकीय कामातील हस्तक्षेपासह अनेक तक्रारींवर आक्षेप घेत मुख्याधिकारी डॉ. चेतना केरुरे यांनी यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत नगराध्यक्षा लढ्ढा यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. पाठोपाठ नगरसेवकांनी त्यांच्या कामावर आक्षेप नोंदवत विकास आराखड्यातील झोनबदल विषय चर्चेत आला. इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर पर्वतरांगेतील डोंगरमाथ्यावरून अनेक नद्यांचे उगम होतात. असे महाराष्ट्राला ४० टक्के पाणीपुरवठा करणारे डोंगरमाथेच पिवळ्या झोनमध्ये रूपांतरित करण्यावरून महिन्यापासून वाद सुरू आहे. जिल्हाधिकारी स्तरावर या प्रकाराची चौकशी सुरू आहे. 

यांनी दिला अविश्‍वासाचा प्रस्ताव
भाजप गटनेते योगेश तुंगार, रवींद्र सोनवणे, यशोदा अडसरे, अलका शिरसाठ, अंजना कडलग, रवींद्र गमे, सिंधूबाई मधे, ललित लोहगावकर, अभिजित काण्णव, अनघा फडके, तृप्ती धारणे, शकुंतला वायणे, आशाबाई झोंबाड आदी १३ नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या कामकामावर आक्षेप घेत त्यांच्याविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला.

२३ ला नवा नगराध्यक्ष
१३ नगरसेवकांनी अविश्‍वास प्रस्तावाची जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दखल घेतली असून, २३ जूनला नव्या नगराध्यक्ष निवडीसाठी नगरसेवकांची बैठक बोलावली आहे.

Web Title: nashik news trambakeshwar mayor untrust proposal