पाहण्यासाठी पाहुणे येण्याआधीच प्रेमप्रकरणातून खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

त्र्यंबकेश्‍वर (नाशिक): पाहण्यासाठी पाहुणे येण्याआधीच घरात एकट्या असलेल्या युवतीचा नरधमाने नांगराच्या "जू'ने निर्घूण खून केल्याची घटना शुक्रवारी (ता. 23) सायंकाळी सातच्या सुमारास गणेशगाव (वा.) (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे घडली होती. त्र्यंबकेश्‍वर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपास करीत सोमवारी (ता. 26) मध्यरात्री संशयितास अटक केली. हा खून प्रेमककरणातून झाला असल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे. संशयिताचे नाव अनंता जयराम महाले (वय 28) असे असून तो त्याच गावातील आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली.

घटनेची माहिती अशी : गणेशगाव (वा.) येथील गावापासून अडीच किलोमीटरवर श्रीमती ताईबाई चंदर महाले या दोन मुलींसह शेतात राहत्या होत्या. पितृछत्र हरपल्यामुळे ताईबाईंवरच मुलींची जबाबदारी होती. मुलीच या ताईबाईंच्या वंशाच्या दिवा होत्या. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी मोठ्या मुलीने व पीडित रंजनाने आपल्या खांद्यावर आईसोबत घेतली होती. दोघी भगिनी मोलमजुरीसाठी विनायकनगरहून गिरणारे येथे जात होत्या. शनिवारी (ता. 24) रंजनाला बघण्यासाठी पाहुणे मंडळी येणार होती. त्याचे आमंत्रण देण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी ताईबाई गावातील भाऊबंदांना सांगण्यासाठी गेली होती. मोठी बहीण मजुरीला गेली होती. सायंकाळी सातच्या सुमारास रंजना एकटीच होती. घरात स्वयंपाकाची तयारी करीत असताना, काही अज्ञातांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. रंजना प्रतिकार करत असल्याचे पाहून त्यांनी तिला घराबाहेर ओढत नेले. रंजना मदतीसाठी आवाज देत असताना, संशयितांनी तिच्या डोक्‍यात नांगरासाठी वापरले जाणाऱ्या "जू'ने डोक्‍यात प्रहार करीत तिचा खून केल्याचे घटनास्थळी आढळून आले होते. या प्रकरणी त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध खुना गुन्हा नोंदविण्यात आला होता. घटनास्थळी वरीष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्यानंतर स्थानकि गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाची सूत्रे हाती घेतली. त्र्यंबकेश्‍वर पोलिसांच्या मतीने सुरवातीला चार संशयितांना ताब्यात घेतले. या संशयितांकडून व परिसरात ठाण मांडून असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने काल अनंता जयराम महाले (वय 28; रा. विनायकनगर) यास ताब्यात घेतले.

वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक करपे यांनी केलेल्या चौकशीत प्रेमप्रकरणातून त्याने खून केला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. या संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेत अजून काही जणांचा समावेश आहे का, हे तपासून बघावयाचे असल्याचे तपासी अधिकाऱ्यांनी "सकाळ' शी बोलताना सांगितले.

Web Title: nashik news trimbakeshwar girl murder love affair