माउलींच्या रिंगण सोहळ्यात स्त्री-पुरुष समानतेचे घडले दर्शन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

त्र्यंबकेश्‍वर - संत निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला आज अंजनेरीच्या ब्रह्मा व्हॅली मैदानावर माउलींच्या नामस्मरणात दंग झालेल्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या रिंगण सोहळ्यातून स्त्री-पुरुष समानतेचे दर्शन घडले. यात्रोत्सवासाठी वारकऱ्यांच्या दिंड्या नगरीत दाखल होण्यास सुरवात झाली असून, उद्या (ता. 12) पहाटे साडेतीनला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संत निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधीची महापूजा होईल. 

भागवत धर्माची पताका फडवत, टाळ-मृदंगांचा निनाद अन्‌ मुखी माउलीचा गजर करत सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरगावपासून सहा दिंड्यांच्या सोहळ्याला सुरवात झाली. या दिंड्या दाखल झाल्यानंतर 3 जानेवारीपासून जायखेडा (ता. बागलाण) येथील कृष्णाजी माउली पायी दिंडीसमवेत एकत्रित सर्व दिंड्यांमधील वारकऱ्यांनी त्र्यंबकेश्‍वरकडे प्रस्थान केले. 14 दिवस आणि 350 गावांमधील भक्तांचा आनंदोत्सव साजरा करत हा सोहळा ब्रह्मा व्हॅली मैदानावर पोचला. इथे फुगड्यांच्या आनंदात वारकरी रमलेत. दही-हंडीच्या स्वरूपात माउलींच्या पालखीला सलामी देण्यात आली. यंदाच्या रिंगण सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रथमच वारकऱ्यांपाठोपाठ विद्यार्थीही सहभागी झालेत. 

"प्रती वाखरी'चा यशोदा अक्कांचा प्रयत्न 
पंढरपूरच्या वारीचे वाखरीचे रिंगण वारकरी संप्रदायाचा मानबिंदू बनले आहे, तसा मानबिंदू पौष दशमीला अंजनेरी येथे करण्याचा मानस जायखेड्याच्या दिंडीच्या प्रमुख यशोदा अक्का यांचा आहे. संत निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सवासाठी दिंडीस यंदा 62 वर्षे पूर्ण होतील. जायखेड्याचे कृष्णाजी माउली यांनी ही परंपरा सुरू केली. त्यांच्या महानिर्वाणानंतर त्यांची कन्या यशोदा अक्का दिंडीच्या प्रमुख बनल्या आहेत. वयाच्या साठीमध्ये वारकरी म्हणून असलेला त्यांचा उत्साह वाखणण्याजोगा आहे. रिंगण सोहळ्यात त्यांची उपस्थिती राहिली.

Web Title: nashik news Trimbakeshwar Sant Nivittinath Maharaj