कर्मचाऱ्यांच्या आधीच मुंढे पालिकेत हजर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

नाशिक - शिस्तप्रिय अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. आतापर्यंत मुंढे यांच्या कामकाजाची पद्धत फक्त ऐकिवात होती; परंतु पालिका मुख्यालयाच्या पायऱ्या चढण्यापासूनच कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कामाचा अनुभव घेतला. कर्मचारी कार्यालयात हजर होण्यापूर्वीच मुंढे पालिका मुख्यालयात हजर झाल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.

पदभार स्वीकारण्याचा सोपस्कार अर्धा तासात पार पाडल्यानंतर विभाग प्रमुखांच्या बैठकीला अग्निशामक विभागाचे प्रमुख अनिल महाजन हे गणवेश घालून न आल्याने त्यांना जागेवर समज देत गणवेश घालून येण्यास सांगितल्याने अधिकारी वर्ग अवाक झाला.

महापालिकेचे मावळते आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी पदाचा कार्यभार कर्मचाऱ्यांमार्फत नूतन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपविला. आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास मुंढे यांचे प्रशासनाच्या वतीने शासकीय विश्रामगृहावर स्वागत करण्यात आले. पालिका मुख्यालयात दहा वाजण्यापूर्वीच मुंढे यांनी प्रवेश केल्याने सुरक्षा रक्षकांसह उपस्थित कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. आयुक्त पालिकेत हजर झाल्याचे कळताच कर्मचारी धावपळ करीत पालिकेत हजर झाले. आयुक्तांनी कार्यालयाची माहिती जाणून घेतली. तसेच स्थायी समितीचे कार्यालय कुठे आहे, याबाबत त्यांनी विचारणा केली. विशेष म्हणजे तेथे काही वेळ थांबून मुंढे यांनी पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त कार्यालयाचीदेखील त्यांनी पाहणी केली.

गणवेशासाठी घरी पाठविले
तुकाराम मुंढे यांनी दहा वाजून दहा मिनिटांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विभाग प्रमुखांची बैठक बोलाविण्यात आली. बैठकीला अग्निशामक विभागाचे प्रमुख अनिल महाजन उशिराने आले. ते गणवेशात नसल्याने आयुक्तांनी त्यांना समज दिली. महाजन घरी जाऊन गणवेश परिधान करून पुन्हा बैठकीला हजर झाले.

Web Title: nashik news tukaram munde municipal