वडार समाजाचा येवल्यात 12 ऑगस्टला मेळावा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

नाशिक - एक देश एक संविधान असेल तर एक जात एक प्रवर्ग का नाही? या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी "वडार कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडिया' संघटनेच्या वतीने 12 ऑगस्टला येवला येथे वडार समाजाचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

संघटनेने म्हटले आहे, की देशातील विविध राज्यांतील वडार समाजाला जातीच्या वेगवेगळ्या प्रवर्गांमध्ये मोडले गेले आहेत. त्यामुळे त्यांना कायद्याचे संरक्षण मिळत नाही. भारतीय संविधानात त्यांच्यासाठी कुठलीही तरतूद नाही. संपूर्ण देशात एक संविधान लागू असताना एक जात एक प्रवर्ग का नाही? महाराष्ट्रातील वडार समाजातील 96 टक्के लोक निरक्षर आहेत. त्यांचा पारंपरिक व्यवसायदेखील आता संपुष्टात येत आहे. समाजातील 70 टक्के लोकांना हक्काचे घर नाही. समाजातील लोकांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे देशातील वडार समाजाला एकत्र आणून जनजागृती करण्यात येणार आहे.

Web Title: nashik news vdar society 12th august campaign