नाशिक मुंबईचे किचनच नव्हे, तर  भाजीपाला प्रोसेसिंग हब

राजू पाटील
रविवार, 27 ऑगस्ट 2017

नाशिक - ग्राहकांना ताजा भाजीपाला बाजारातून खरेदी करण्यासाठी मॉल कंपन्यांनी थेट स्मार्ट एक्‍झिक्‍युटिव्ह नेमत या क्षेत्राला नवा आयाम दिला. मॉलसंस्कृतीमुळे हे ‘मॉल कृषिदूत’ शेतकऱ्यांसाठी खरेखुरे देवदूत ठरले आहेत. नाशिक बाजार समितीत सध्या विविध मॉल कंपन्यांचे २१ प्रतिनिधी कार्यरत असून, ते दररोज लाखोंचा भाजापीला विविध मॉलसाठी खरेदी करताहेत. शहरात वाढत जाणाऱ्या मॉलच्या संख्येमुळे निव्वळ भाजीपाला क्षेत्र हाताळण्यासाठी आगामी पाच वर्षांत किमान सहा हजार कुशल- अकुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे. 

इलेक्‍ट्रॉनिक्‍स गुड, फॅशनेबल कपडे, शूज, टॉइज, अशी प्रतिमा असलेल्या मॉलने महिला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ताजा भाजीपाला आणि फळांचा विभाग गेल्या पाच वर्षांत विस्तारित केला आहे. केवळ एका कोपऱ्यात असलेल्या या विभागाने आता प्रत्येक मॉलमध्ये किमान १० टक्के जागा व्यापली आहे. भेंडी, कोबी, पालक, बटाटे, फ्लॉवर, वांगी आदी दररोजच्या जेवणातील ताज्या आणि ग्रेडिंग केलेल्या भाज्या रिलायन्स, बिग बाजार, डीमार्ट, वॉलमार्ट, विशाल, बिर्ला समूह हे मॉल नाशिकमधून मोठ्या प्रमाणात खरेदी करून मुंबईतील मॉलसाठी पाठवत आहेत. 

नवी मुंबईत भाजीपाला महाग मिळत असल्याने नाशिकला तो खरेदी करून त्याचे ग्रेडिंग करून कूलिंगची सुविधा असलेल्या व्हॅनमधून तो भिवंडी, ठाणे आणि नवी मुंबईतील डेपोत पाठविला जातो. या तिहेरी साखळीमुळे किमान तीन हजार प्रशिक्षित तरुणांना आणि वाहतुकीसाठी चार हजार अकुशल तरुणांना सध्या रोजगार मिळत आहे. ‘असोचॅम’च्या अहवालानुसार मुंबई-नाशिकदरम्यान केवळ फ्रेश भाजीपाला वितरणात आगामी पाच वर्षांत आणखी सहा हजार कुशल-अकुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे. त्यामुळे मुंबईचे किचन ही नाशिकची बिरुदावली आणखी घट्ट होणार आहे.   

नाशिक बाजार समितीत विविध मॉलचे २१ तरुण अधिकारी दररोज सकाळी विविध दलालांकडून, तसेच शेतकऱ्यांकडून किमान दोन कोटींचा भाजीपाला खरेदी करतात. कूलिंग व्हॅनमध्ये हा भाजीपाला भरून तो ग्रेडिंगसाठी तातडीने विल्होळी, गोंदे, सिन्नर, दिंडोरी येथील कूलिंग आणि प्रोसेसिंग युनिटला पाठविला जातो. 

तेथे किमान चार हजार अर्धकुशल महिला, पुरुष त्याच्या दर्जानुसार ग्रेडिंग करून तो हवाबंद प्लास्टिक रॅपरमध्ये पॅक करतात. केवळ मॉलमुळे दर्जेदार मालाला मागणी वाढत असून, त्याचा उठाव होत असल्याने वाया जाण्याचे प्रमाण कमी होत आहे. 

प्रक्रिया युनिटला सुवर्ण दिन 
विल्होळी, इगतपुरी, निफाड व दिंडोरी या पट्ट्यात भाजीपाला प्रोसेसिंग युनिटची संख्या सध्या पंधराच्या आसपास आहे. नाशिकचा विस्तार, मॉलची वाढणारी शाखा आणि स्मार्टसिटीमुळे आगामी पाच वर्षांत या युनिटची संख्या किमान साठवर जाईल. सध्या चैतन्य अग्रो, कॅप्रिकॉर्न, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स, फूड्‌स ॲन्ड इन, फिन्स फ्रोजन फूड्‌स आदी प्रमुख कंपन्या या क्षेत्रात आघाडीवर आहेत. विंचूर येथे पन्नास एकरावर फूड प्रोसेसिंग पार्कचे काम सुरू आहे. तो कार्यान्वित होताच नाशिकमध्ये आणखी गुंतवणूक वाढण्यास मदत होईल.

Web Title: nashik news vegetables