विजया झळकेंच्या जीवनात आर्थिक स्वातंत्र्याची पहाट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

"सकाळ'ने झळके कुटुंबीयांची वाताहत, असे वृत्त देऊन या कुटुंबाची नाजूक परिस्थिती समाजासमोर आणली होती. कर्ता माणूस गेलेला असताना आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विजया झळके यांनी समाजासमोर ठेवलेल्या आदर्शाची दखल घेत भद्रकालीतील राधिका नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन शाखेत श्रीमती झळके यांना सहकार्य करण्याचा निर्धार केला आहे.

नाशिक : अपघातात ब्रेनडेड झालेल्या अश्‍विन झळके यांच्या मृत्युपश्‍चात अवयवदानासाठी हिंमत दाखविणाऱ्या त्यांच्या पत्नी विजया झळके यांच्या आयुष्यात नवा प्रकाश फुलविण्यासाठी राधिका नागरी सहकारी पतसंस्था त्यांच्या मदतीला धावून आली आहे. श्रीमती झळके यांची कनिष्ठ लिपिकपदी नेमणूक करत आर्थिक स्वातंत्र्याची पहाट फुलविली आहे. 

"सकाळ'ने झळके कुटुंबीयांची वाताहत, असे वृत्त देऊन या कुटुंबाची नाजूक परिस्थिती समाजासमोर आणली होती. कर्ता माणूस गेलेला असताना आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विजया झळके यांनी समाजासमोर ठेवलेल्या आदर्शाची दखल घेत भद्रकालीतील राधिका नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन शाखेत श्रीमती झळके यांना सहकार्य करण्याचा निर्धार केला आहे. श्री अवधूत स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त गुणगौरव समारंभ झाला. त्यात प्रमुख पाहुणे असलेले राधिका नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष भारत धुमाळ यांनी ही घोषणा केली. 

पतसंस्थेची अठरावी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष पद्‌मानंद घोंगाणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. संस्थेला आठ लाखांपेक्षा जास्त नफा झाला असून, "अ' ऑडिट वर्ग प्राप्त झाला आहे. संस्थेच्या आठ कोटींपेक्षा जास्त ठेवी आहेत. सभेनिमित्त संस्थेच्या सभासदांनी विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी राधिका इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष व राधिका नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष भारत धुमाळ, महाराष्ट्र वीरशैव सभा, जिल्हा समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर दंदणे, पुण्याचे उपाध्यक्ष अनिल चौघुले यांच्या हस्ते गुणगौरव समारंभ झाला. या वेळी भारत धुमाळ यांनी, झळके कुटुंबीयांनी दाखविलेल्या सामंजस्याबद्दल आभार मानले. पतसंस्थेच्या नवीन शाखेत श्रीमती झळके यांना नोकरी देणार असल्याचेही जाहीर केले. भद्रकाली शाखेचे उद्‌घाटन होईपर्यंत श्री अवधूत स्वामी पतसंस्थेत कनिष्ठ लिपिक म्हणून श्रीमती झळके यांना प्रशिक्षण दिले जाईल, असे श्री. घोंगाणे व गणेश भोरे यांनी जाहीर केले. 

संस्थेचे संचालक ऍड. अरुण आवटे यांनीही मदतीची भावना व्यक्‍त केली. ऍड. आवटे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे संयोजन पतसंस्थेच्या उपाध्यक्षा लतिका साखरे, सचिव अरुणा भोरे, ज्येष्ठ संचालक विश्‍वनाथ गाडे, श्‍यामराव झारेकर, उमाकांत उदार, प्रमोद हिंगमिरे आदींनी केले. श्री. तांदळे यांनी आभार मानले. 

Web Title: Nashik news Vijaya Zalke financial support