शिक्षक मतदारसंघासाठी २५ जूनला मतदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

नाशिक - केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी (ता. २४) राज्यातील विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये नाशिक-मुंबई शिक्षक अन्‌ मुंबई-कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचा समावेश आहे. चारही मतदारसंघात २५ जूनला मतदान होत आहे. 

यापूर्वी शिक्षक उन्हाळ्याच्या सुटीवर असल्याने ८ जूनला होणारी निवडणूक पुढे ढकलण्यात आली. डॉ. अपूर्व हिरे, कपिल पाटील, डॉ. दीपक सावंत, निरंजन डावखरे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०१८ ला संपत असल्याने आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. येत्या ३१ मेस निवडणुकीची आचारसंहिता जारी होईल. ७ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. ८ जूनला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. ११ जूनपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. २५ जूनला सकाळी आठ ते सायंकाळी चारपर्यंत मतदान तर २८ जूनला मतमोजणी होईल. 

नाशिक विभाग मतदार संख्या
जिल्हा    पुरुष    महिला    एकुण
नाशिक    १०२१९    ४२३८    १४४५७
नगर    ९७२०    ३१६२    १२८८२
जळगाव    ९०९८    २६००    ११६९८
धुळे    ६४१३    १५०६    ७९१९
नंदुरबार    ४१७४    १०७१    ५२४५
एकूण    ३९६२४    १२५७७    ५२२०१

Web Title: nashik news Voting on June 25 for the teacher's constituency