नाशिकमध्ये थंडीच्या कडाक्‍यात वाढ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

नाशिक - शहर व जिल्ह्यात तापमान पुन्हा घसरले असून, पारा 8 अंशांपर्यंत खाली आला आहे. तापमान घसरल्याने द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून, याचा दैनंदिन जनजीवनावरही मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यात दोन वर्षांत तीनदा अवकाळी पावसाचा दणका बसला. ओखी वादळाचा फटका बसल्याने अगोदरच अडचणीत असलेल्या द्राक्षबागांवर पुन्हा मणी तडकण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाशिक, दिंडोरी, निफाडसह द्राक्षबागांचे मोठे प्रमाण असलेल्या भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दैनंदिन कामकाज रोडावल्याचे दिसत असून, सायंकाळपासून रस्त्यावर शुकशुकाट जाणवत आहे. 

Web Title: nashik news winter weather

टॅग्स