जागतिक नदी दिनानिमित्त सामाजिक संस्थांकडून गोदाआरती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

नाशिक - जागतिक नदी दिनानिमित्त आज सनविवि फाउंडेशन, नमामि गोदा, रॅली फॉर रिव्हर्स यांसह विविध सामाजिक संस्थांनी गोदावरीची आरती केली. सायंकाळी सातला मोठ्या भक्‍तिभावात झालेल्या आरतीसाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. गोदामातेविषयी त्यांनी आपला प्रेमभाव प्रकट केला. आरतीनिमित्त गोदावरी प्रदूषणमुक्‍त करण्याचा संदेश देण्यात आला.

सनविवि फाउंडेशनचे धीरज बच्छाव, डॉ. स्नेहा बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते निशिकांत पगारे, राजेश पंडित, अभिनेत्री नूपुर सावजी, धनश्री हरदास, श्री. शुक्‍ल यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग नोंदविला. प्रारंभी गणरायाची आरती व नंतर गंगा गोदावरी आरती म्हणत नाशिककरांनी गोदावरी नदीविषयीचे प्रेम व्यक्‍त केले.

आरतीच्या वेळी दीपांनी उजळून निघालेल्या गोदाकाठाच्या वातावरणात शंखवादन अन्‌ गंगा गोदावरीच्या भाविकांनी केलेल्या जयजयकारातून वातावरण प्रसन्न झाले होते.

या उपक्रमात शिवकल्याण कला व सांस्कृतिक मंडळ, नाशिक नवनिर्मिती बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नवनाथपंथी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, गोदावरी गटारीकरणविरोधी मंच यांसह विविध सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदविला. मयूर बिरारी, डॉ. संकेत चव्हाण, प्रीतेश जाधव, केयूर कुलकर्णी, अजिंक्‍य करंजुले आदी उपस्थित होते.

Web Title: nashik news World river day