नाशिक जिल्ह्यात कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही तुटपुंजी असून नियमित कर्ज भरणारे शेतकरी यातून वंचित राहणार आहेत. त्यामुळे सरकारने सरसकट 30 जून 2017 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी करीत कुठलेच कर्ज न भरण्याचा ठराव करून येवल्यामध्ये शेतकरी संघटनांनी कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली.

येवला (जि. नाशिक) - राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही तुटपुंजी असून नियमित कर्ज भरणारे शेतकरी यातून वंचित राहणार आहेत. त्यामुळे सरकारने सरसकट 30 जून 2017 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी करीत कुठलेच कर्ज न भरण्याचा ठराव करून येवल्यामध्ये शेतकरी संघटनांनी कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली.

"कर्जमाफी फक्त थकित कर्जदारांनाच का? आम्ही नियमित कर्ज भरुन चूक केली का?' असा संतप्त सवाल उपस्थित करून येवला तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये नियमित कर्ज थकविण्याचे आवाहन शेतकरी करण्यात आले. तसेच शासनाने 30 जून 2017 पर्यंतचे सरसकट कर्ज माफ करावे, अशी मागणी करीत शासन निर्णयाची होळी करण्यात आली. तसेच कुठल्याही बॅकेचे कर्ज, वीजबिल, शासकीय कर न भरण्याचा एकमताने ठराव करून निर्णय घेण्यात आला व संप आंदोलन तीव्र करण्याचे ठरले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यक्रमास सरपंच आशाताई निकम, उपसरपंच नारायण गुंजाळ, खरेदी विक्री संघाचे संचालक भागुजी महाले, माजी चेअरमन फकिरा निकम, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आनंदराव महाले, निवृत्ती ठोंबरे, रमेश निकम, हनुमान काळे, पांडुरंग गायके , नवनाथ तनपुरे, बाळू तनपुरे, सुरेश बढे, गोरख जगताप, सुरेश जगताप, दतु गायके , माधव निकम, शंकर गुंजाळ, दत्तु मुरकुटे , राजेंद्र महाले, घमाजी तनपुरे, गंगाधर बढे, अरुण मुरकुटे यांच्या सह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Web Title: nashik news yeola news loan waiver farmer issue