वेतनासाठी 'रासाका'च्या कामगारांसह स्वाभिमानीचा हल्लाबोल मोर्चा

माणिक देसाई
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

साखर आयुक्तांच्या दुर्लक्षझाल्यामुळे पगार होत नसल्याने रासाकाच्या तीन कामगारांनी गेल्याच आठवड्यात राँकेल ओतुन जिवन संपवण्याचा प्रयत्न झाला होता तरी साखर आयुक्तांना आणि शासनाला जाग आली नाही त्यामुळे कामगार आणि शेतकरी यांच्यात तिव्र संताप आहे त्याची दखल घेत साखर आयुक्त आणि कारखाना चालवयला घेणार्याने कायद्यान्वये कामकाज का केले नाही.

निफाड : विधान सभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या ताब्यातील रानवड सहकारी साखर कारखाना चालु व्हावा आणि कामगार तसेच शेतकरी यांची थकीत देणी मिळावी तसेच शेतकरी आणि कामगारांवर होणार्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रासाका कामगार संघटनेच्या दुपारी बारा वाजता निफाड तहसिल कार्यालयावर हलाबोल मोर्चा काढण्यात आला यावेळी गत आठवड्यात आत्मदहन अंदोलन करणार्या तीन कामगारांसह महिलांनी निफाडच्या तहसिल दारां समोर आपबिती सांगत आश्रुंना वाट मोकळी करुन देत मागण्यांचे निवेदन दिले. 

स्वाभिमानी शेतकरी आणि रासाका कामगार तसेच शेतकऱ्यांच्या हल्ला बोल मोर्चाला निफाङ बाजार समिती आवारातुन बारा वाजेच्या सुमारास सुरवात झाली हा मोर्चा बसस्थानक मार्गी तहसिल कार्यालयाच्या आवारात येताच मोर्चाचे रूपांतर सभेत झाले या सभेला शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष  गोविंद पगार ,सोमनाथ बोराडे , संदीप जगताप ,साहेबराव गायकवाड कडलग यांनी आपल्या भाषनांतुन आक्रमक मुद्दे मांडत रासाका सुरळीत चालु झाल पाहीजे तसेच कामगार आणि शेतकरी यांची थकीत देणी मिळाली आणि रासाकाची मशनरी भंगारात विकणार्या लथ वाबळेंवर कायदेशीर कार्यवाही झाली पाहीजे याचा निर्णय महीनाभरात घ्या अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रासाका कामगार आणि शेतकऱ्यांना घेवुन विधानसभा अध्यक्ष हरीभाउ बागडेंच्या दालनाला घेराव घालत जाब विचारणार असल्याचा इशार देण्यात आला.
दरम्यान, मोर्चेकर्यांचे निवेदन स्विकारण्यासाठी आलेल्या निफाडचे तहसिलदार विनोदभामरे यांच्या समोर गत आठवड्यात आत्मदहन अंदोलन करणार्या तीन कामगारांसह महिलांनी आपली आपबिती सांगत आश्रुंना वाट मोकळी करुन दिल्याने वातावरण धिरगंभिर झाले होते त्यावेळी आत्महत्या करु नका   तुमच्या भावना शासना पर्यंत पोहचवतो आसे तहसिल दारांनी सांगत मोर्चेकर्यांकडुन त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

या निवेदनात म्हटले आहे की रानवड सहकारी साखर कारखाना शासनाने ६ वर्षासाठी भाडेतत्वावर चालवण्यासाठी दिला गेला मात्र या कारखान्याच्या अटि आणि शर्तिकडे शासन आणि साखर आयुक्त यांनी दुर्लक्ष केल्यामुळे   कारखान्यातील कामगार आणि शेतकऱ्याची देणी थकलेली आहे यामुळे शेतकरी कामगारांची उपासमार होत आहे तसेच साखर आयुक्तांच्या दुर्लक्ष झाल्यामुळे पगार होत नसल्याने रासाकाच्या तीन कामगारांनी गेल्याच आठवड्यात राँकेल ओतुन जिवन संपवण्याचा प्रयत्न झाला होता तरी साखर आयुक्तांना आणि शासनाला जाग आली नाही त्यामुळे कामगार आणि शेतकरी यांच्यात तिव्र संताप आहे त्याची दखल घेत साखर आयुक्त आणि कारखाना चालवयला घेणार्याने कायद्यान्वये कामकाज का केले नाही. तसेच रासाका सुरळीत चालु झाला पाहिजे याच जाब शासन आणि प्रशासनाला विचारण्यात येणार असल्यामुळे रासाकाचे उस उत्पादक शेतकरी रासाका कामगार यांनी आजचा मोर्चा काढला आसुन येत्या महिना भरात निवेदनातील मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र अंदोलन करण्याच इशारा देण्यात आला या मोर्चात स्वाभिमानीचे गोविंद पगार,  सोमनाथ बोराडे , संदीप जगताप, सुधाकर मोगल, भाऊसाहेब तासकर तर रासाका युनियनचे बळवंत जाधव, नेताजी वाघ ,रावसाहेब जाधव, नितीन कोरडे, पुंजाराम कडलग, विकी अरोटे , रान्याबाई वाढवणे, सुनंदा सोनवणे, सुवर्णा कुशारे, संगिता क्षिरसागर, लता गोरडे,अंजनाबाई जाधव, सिंधुबाई चव्हाण, विमल चव्हाण, पदमावती आहेर ,वसंत खडांगळे, बिजी आहेर, आदींसह रासाका कामगार शेतकरी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थितीत होते.

निफाड तहसील कचेरीवर रासाका कामगारांच्या थकीत पगारा साठी त्यांच्या रणरागीनी ही हातात ऊस आणि आपल्या मागण्यांचे फलक घेवुन  मोर्चात सहभागी झाल्या होत्या तहसिलच्या आवाराबाहेर रासाका चालु नसल्याने होत असलेल्या हालअपेष्टांची आपबिती कथन करतांना नकळत ओघळलेल्या अश्रुनी अनेकांना हेलवले
 

Web Title: nashik niphad swabhimani morcha