esakal | नाशिक जिल्ह्यात पावसामुळे एक लाख ३९ हजार हेक्टरची धूळधाण; मक्याला सर्वाधिक फटका
sakal

बोलून बातमी शोधा

Damage to agricultural crops due to heavy rainfall

नाशिक जिल्ह्यात पावसामुळे एक लाख ३९ हजार हेक्टरची धूळधाण

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : अतिवृष्टीने गेल्या महिन्यात एक लाख ३८ हजार ६३५ हेक्टरवरील पिकांची धूळधाण केली आहे. सर्वाधिक ६० हजार हेक्टरहून अधिक मक्याच्या क्षेत्राला फटका बसला आहे. याशिवाय भात, बाजरी, सोयाबीन, ज्वारी, कापूस, कांदा, कांदारोपे, भाजीपाला, लिंबू, द्राक्षे, डाळिंबाचे नुकसान झाले आहे. मालेगाव तालुक्यातील ४५ हजार ७९२, तर नांदगाव तालुक्यातील ४२ हजार ९६० हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने दिला आहे.

४०० गावांतील शेतकऱ्यांना नुकसानीची झळ

कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल असला, तरीही पावसाने नुकसानीचा फटका दिलेल्या नेमक्या क्षेत्राची स्थिती पंचनाम्यातून पुढे येणार आहे. सरकारने नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश देत असताना मदतीची ग्वाही पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे यांनी जिल्हावासीयांना दिली. जिल्ह्यात ७ आणि ८ सप्टेंबरच्या अहवालानुसार मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील ५४ हजार ८७७, तर २७ ते ३० सप्टेंबरमध्ये मालेगाव, नांदगाव, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, पेठ, निफाड, येवला तालुक्यातील ८३ हजार ७५८ हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या महिन्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्रात कापसाचे २९ हजार ४७, कांद्याचे १६ हजार १२८, कांदा रोपांचे ५ हजार ८३६ हेक्टरचा समावेश आहे. आताच्या मागील चार दिवसांमधील पावसात जिल्ह्यातील ४०० गावांतील एक लाख आठ हजार १५२ शेतकऱ्यांना नुकसानीची झळ बसली आहे.

हेही वाचा: बापाच्या डोळ्यादेखत लेकाच्या मृत्यूतांडव; थरारक 13 तास

तालुकानिहाय नुकसानीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये) असे :

सप्टेंबरमधील पहिला आठवडा - मालेगाव- २२ हजार ४४७, नांदगाव- ३२ हजार ४१६, कळवण- १५.

सप्टेंबरमधील अखेरचा आठवडा- मालेगाव- २२ हजार ३४५, नांदगाव- १० हजार ५४४, दिंडोरी- १०, सुरगाणा- ३८.७०, त्र्यंबकेश्‍वर- ११५, इगतपुरी-१०२.६१, पेठ- १४८.२०, निफाड- १ हजार ७७०, येवला- ४८ हजार ६८४.

पीकनिहाय नुकसानीची स्थिती (आकडे हेक्टरमध्ये)

पिकाचे नाव ७ व ८ सप्टेंबर २७ ते ३० सप्टेंबर

मका १६ हजार ९३६ ४३ हजार २७५

बाजरी ७ हजार ६७३ ७ हजार ५४८

भुईमूग २९२ १ हजार १६३

सोयाबीन १८०.७२ ८ हजार ५४८

ज्वारी २५ ८०

तूर ३.३० -

कापूस (जिरायती) १५ हजार २१ ६ हजार ६६५

कापूस (बागायती) ७ हजार ३४१ २०

हेही वाचा: जलसंपदाचे कोणतेही कार्यालय मराठवाड्यात जाणार नाही- जयंत पाटील

कांदा ६ हजार १८६ ९ हजार ९४२

कांदारोपे ८६३ ४ हजार ९७३

भाजीपाला ३४४.१७ ८६९

द्राक्षे ६.६७ १६४

डाळिंब ५ २४१

भात - २५६.३१

लिंबू - ५

loading image
go to top