Nashik : महानगरपालिका क्षेत्रात विकासकामांसाठी 10 कोटी मंजुर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MMC

Nashik : महानगरपालिका क्षेत्रात विकासकामांसाठी 10 कोटी मंजुर

मालेगाव (जि. नाशिक) : महापालिका (Municipal Corporation) क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधा संदर्भातील विकासकामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मालेगाव कॅम्प, संगमेश्वर, सोयगाव-नववसाहत, कलेक्टर पट्टा-अयोध्यानगर, भायगाव-नववसाहत, सायने बुद्रुक, दरेगाव, म्हाळदे, द्याने-रमजानपुरा व इतर भागात कामे केली जातील. कृषिमंत्री दादा भुसे (Dadaji Bhuse) यांच्या प्रयत्नांतून संबंधित निधी मंजूर झाला आहे. (10 crore sanctioned for development works in municipal area Nashik Development News)

मालेगाव शहरातील विविध विकासकामांसाठी याआधीच शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शहर व तालुक्यासाठी २०२२ हे विकासाचे वर्ष असेल. दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले. सोयगाव-नववसाहत, कलेक्टर पट्टा-अयोध्यानगर, मालेगाव कॅम्प, भायगाव-नववसाहत, म्हाळदे, सायने, द्याने-रमजानपुरा, दरेगाव या भागात भूमिगत गटारीसह रस्ते काँक्रिटीकरणाची कामे केली जातील.

हेही वाचा: खड्डा नव्हे डासांचा अड्डा; महाकाय खड्डा बुजविण्याची मागणी

भायगाव येथे व्यायामशाळा, बाळासाहेब ठाकरे क्रीडासंकुल, ओपन ऑडिटोरियम सुशोभीकरण करणे व जिम साहित्य, डी. के. चौक गार्डन दुरुस्ती करणे, मोसम पूल, मराठी शाळा दुरुस्ती करणे, तसेच सायने बुद्रुक, द्याने, रमजानपुरा, दरेगाव, म्हाळदे येथे व्यायामशाळा, जिम बांधणे व साहित्य आदी कामे केली जाणार असल्याचे श्री. भुसे यांनी कळविले आहे.

हेही वाचा: नाशिक : स्त्रीधन वगळता सर्वच मालमत्तांवर येणार टाच

Web Title: 10 Crore Sanctioned For Development Works In Municipal Area Nashik Development News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top