खड्डा नव्हे डासांचा अड्डा; महाकाय खड्डा बुजविण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pit in narayanbapuNagar

खड्डा नव्हे डासांचा अड्डा; महाकाय खड्डा बुजविण्याची मागणी

नाशिकरोड : सध्या एका महाकाय खड्ड्यांची (Pit) चर्चा मोठ्या चवीचवीने जेलरोड येथील नागरिक करीत आहे. नारायणबापूनगर येथे बांधकामासाठी महाप्रचंड खोदलेला खड्डा सध्या तसाच बंद केला आहे. या खड्ड्यात साठणाऱ्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी, घाण व डासांचे (Mosquito) साम्राज्य पसरले आहे. अनेकदा महापालिकेला (NMC) तक्रार करूनही हा खड्डा बुजवला जात नाही. बिल्डरला विनवण्या केल्या, मात्र डोळेझाक करीत असून महापालिका आयुक्तांनी (NMC Commissioner) याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नागरिकांनी व्यक्त केली आहे. (Demand for filling the huge pit in Narayan Bapu Nagar Nashik News)

जेलरोड येथील नारायणबापू नगर इंदिरा गांधी पुतळ्याजवळ रोड फ्रंट असणारा खड्डा सध्या लोकांचे आरोग्य दूषित करणारा होत आहे. खासगी बांधकाम व्यावसायिकाने दीड वर्षांपासून खड्डा खोदून ठेवला आहे. खड्ड्यात पाणी साचले, पाण्यात शेवाळ तयार होऊन दुर्गंधी पसरली आहे.

हेही वाचा: नाशिक : स्त्रीधन वगळता सर्वच मालमत्तांवर येणार टाच

मनपा प्रशासकीय राजवटीत धूर व औषध फवारणी नाही. यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खड्ड्या भोवतीची संरक्षक भिंत जागोजागी तुटली आहे. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. सध्या शाळांना सुटी असल्याने परिसरातील लहान मुलांचा बाहेर राबता वाढला आहे. खड्ड्यात पडून अप्रिय घटना घडू शकते. नाशिक रोड परिसरातील हा सर्वात मोठा खड्डा लोकांच्या आरोग्य समस्येत भर पाडत आहे.

हेही वाचा: प्रेमासाठी वाटेल ते करण्याच्या नादात आला गोत्यात..!

Web Title: Demand For Filling The Huge Pit In Narayan Bapu Nagar Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top