Nashik Crime News : घरमालकाला धक्काबुक्की करत मागितली 10 लाखांची खंडणी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Extortion case

Nashik Crime News : घरमालकाला धक्काबुक्की करत मागितली 10 लाखांची खंडणी!

नाशिक : बंद घरात कागदपत्र ठेवण्यासाठी गेलेल्या घरमालकाकडे आलेल्या चौघांनी दहा लाखाची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटना पखाल रोड भागात घडली. संशयितामध्ये दोन महिलांचा समावेश असून, त्यांनी बळजबरीने घरात प्रवेश करीत घरमालकास धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाला आहेत. (10 lakh ransom demanded by threatening house owner Nashik Crime News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Bafna Crime Case : अखेर बाफणा प्रकरणात 'त्या' दोघांना फाशी!

समीर काझी, अस्लम कुरेशी व दोन अनोळखी महिला, अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी अजहर रफी सय्यद (रा. भाभानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. सय्यद यांची पखाल रोडवरील आकाश दर्शन सोसायटीत सदनिका आहे. २१ जुलैला सय्यद हे वडिलांना घेऊन फ्लॅटमध्ये न्यायालयीन कागदपत्र ठेवण्यासाठी गेले असता ही घटना घडली होती. संशयित पाठोपाठ बळजबरीने घरात शिरून सदनिकेचा ताबा पाहिजे असल्यास दहा लाखाच्या खंडणीची मागणी केली. संशयितांनी त्यांना धक्काबुक्की करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा: Nashik News : गणेशनगर येथील खडीक्रेशर सील; विनापरवाना उत्खननावर जिल्हा प्रशासनाची कारवाई