Latest Marathi News | सर्वसाधारण सभापतीपदामुळे राजकारण रंगणार!; महिलांसाठी सोडतीव्दारे 10 सभापतीपदे आरक्षित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Draw

Nashik News: सर्वसाधारण सभापतीपदामुळे राजकारण रंगणार!; महिलांसाठी सोडतीव्दारे 10 सभापतीपदे आरक्षित

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये आज सोडतीद्वारे जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे आरक्षण सोडतीद्वारे निश्‍चित करण्यात आले. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी निफाड आणि नांदगावचे सभापतीपद राहिले. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्यादृष्टीने पंचायत समित्यांच्या निवडणुकीत राजकारण टिपेला पोचणार आहे. (10 Speaker posts reserved for women by lot Nashik Latest Marathi News)

अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या उपस्थितीत सभापतीपद आरक्षणाची सोडत काढण्यात आली. सभापतीपदाची आरक्षण सोडत निघाल्याने पंचायत समितीसाठी इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला आता वेग येणार आहे. अनुसूचित क्षेत्रातील, अनुसूचित अंशतः क्षेत्रातील आणि अनुसूचित क्षेत्राबाहेरील अशा तीन भागामध्ये पंचायत समित्यांची सभापतीपदे विभागली आहेत. १५ पैकी १० सभापतीपदे महिलांसाठी आरक्षित झाली आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे जिल्ह्याच्या राजकारणात महिलाराज अवतरणार आहे. अनुसूचित क्षेत्राच्या बाहेरील तीन पंचायत समित्यांचे सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे.

त्यातील दोन पदे अनुसूचित जमातीच्या महिलांसाठीची आहेत. दरम्यान, फेब्रुवारी २०१७ मध्ये पंचायत समित्यांची निवडणूक जिल्हा परिषदेसोबत झाली होती. पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचा अडीच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर २१ डिसेंबर २०१९ ला अडीच वर्षांसाठी सभापतीपदाचे आरक्षण जाहीर झाले होते. यापूर्वीचे सभापतीपदाचे आरक्षण असे : सर्वसाधारण महिला-निफाड, नागरिकांचा मागासप्रवर्ग-मालेगाव आणि नांदगाव, नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला-सिन्नर व नाशिक, अनुसूचित जमाती महिला-दिंडोरी, कळवण, बागलाण, सुरगाणा, येवला, अनुसूचित जमाती-इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, देवळा, अनुसूचित जाती-चांदवड.

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

हेही वाचा: Adhartirtha Ashram Crime : आधारतीर्थच्या पदाधिकाऱ्यावर ‘बालविकास’तर्फे गुन्‍हा दाखल

सभापतीपदांचे आरक्षण

अनुसूचित क्षेत्रामधील :

अनुसूचित जमाती-कळवण, सुरगाणा

अनुसूचित जमाती (महिला)-पेठ, त्र्यंबकेश्‍वर

अंशतः अनुसूचित क्षेत्रातील :

अनुसूचित जमाती (महिला)-दिंडोरी

अनुसूचित क्षेत्राबाहेरील :

अनुसूचित जाती (महिला)-इगतपुरी

अनुसूचित जमाती-चांदवड

अनुसूचित जमाती (महिला)-नाशिक, देवळा

नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला)-बागलाण

सर्वसाधारण (महिला)-सिन्नर, येवला, मालेगाव

सर्वसाधारण-निफाड, नांदगाव

हेही वाचा: SAKAL Impact : विविध अधिकारी काकडमाळच्या दारी!; पात्र लाभार्थ्यांना जागीच शिधापत्रिकांचे वाटप