देवळा तालुक्यातील दहा गावे कोरोनामुक्त!

देवळा तालुक्यातील गावातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर आली आहे. इतर गावांचीही कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
 coronavirus
coronavirusGoogle

देवळा (जि. नाशिक) : देवळा तालुक्यातील समूहसंसर्ग( आता बऱ्यापैकी आटोक्यात येत असून, बुधवारी (ता. १९) तालुक्यातील दहा गावे कोरोनामुक्त(Corona free) झाली आहेत. या गावातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर आली आहे. इतर गावांचीही कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. (Ten villages in Deola taluka have become corona free)

अनेक गावे कोरोनामुक्तीच्या वाटेवर

मार्चच्या दुसऱ्या आठवडयापासून तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत गेली. एप्रिलमध्ये जवळपास सर्वच गावांपर्यंत कोरोना पोचला. परंतु येथील आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, तहसीलदार कार्यालय तसेच स्थानिक प्रशासन व गावागावातील कोरोना प्रतिबंधक समित्या यांच्या एकत्रित प्रयत्नाने व नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश येत आहे. लहान-मोठ्या प्रत्येक व्यक्तीने मास्क (Vaccination) लावणे, लसीकरण (Vaccination) करून घेणे, वेळोवेळी हात धुणे, गर्दीचे प्रसंग टाळणे, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, लक्षणे आढळल्यास तातडीने चाचणी (Covid testing) करून घेणे, संस्थात्मक विलगीकरण (Isolation) ठेवत उपचार घेणे अशी प्रत्येक बाब गांभीर्यपूर्वक घेतली. परिणामी कनकापूर, कांचने, भावडे, भिलवाड, विजयनगर, फुलेमाळवाडी, खडकतळे, रामनगर, फुलेनगर, झिरेपिंपळ या गावांत सध्याच्या घडीला एकही सक्रिय कोरोनारुग्ण नाही. याशिवाय निंबोळा, देवपुरपाडे, रणदेवपाडे अशी काही गावे कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. तालुक्यातील कोरोनाचा अटकाव करण्यासाठी सामाजिक संस्था, येथील पोल्ट्री असोसिएशन, देवळा बाजार समिती, देमको बॅंक आदींनी कोरोना केअर सेंटरला अंडी, ऑक्सिजन मशीन व इतर साधने उपलब्द करून दिल्याने कोरोना रोखण्यास मदत झाली.

तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या - ६९९१

बरे झालेली रुग्णसंख्या - ६५५४; मृत्यू - ७०

उपचाराखालील रुग्ण - ३६७

 coronavirus
रेमडेसिव्हिर काळा बाजार प्रकरण : मुख्य सुत्रधार जेरबंद

''देवळा तालुक्यात आतापर्यंत साडेपस्तीस हजारांपेक्षा जास्त तपासण्या करण्यात आल्या. ज्या गावात, वस्तीवर समूहसंसर्ग होण्याची शक्यता वाटल्यास तेथे चाचण्या केल्या. संस्थात्मक विलगीकरणाचा आग्रह धरत औषधोपचार करत राहिलो. यामुळे तालुक्यातील गावे कोरोनामुक्त होऊ लागली आहेत. तरीही नागरिकांनी कोरोना होणार नाही यासाठी सतर्क राहावे.''

- डॉ. सुभाष मांडगे, तालुका आरोग्य अधिकारी

 coronavirus
VIDEO - सावधान! रस्त्यावरून फिराल तर ॲम्ब्युलन्स मधून नेणार ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com