esakal | रेमडेसिव्हिर काळा बाजार प्रकरण : मुख्य सुत्रधार जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

remdesivir

रेमडेसिव्हिर काळा बाजार प्रकरण : मुख्य सुत्रधार जेरबंद

sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (जि.नाशिक) : रेमडेसिव्हिर काळा बाजार (remdesevir black market) प्रकरणी नाशिक (nashik) मधील आडगाव पोलिसानी (aadgaon police) मुख्य संशयितास पालघर जिल्ह्यातून येथून अटक (arrested) करण्यात आली आहे. या संशयिताच्या घरातून तब्बल, ६३ रेमडेसिव्हिर इंजेक्शन (injection) जप्त करण्यात आले आहे.(arrested-main- suspect-in-remedesivir-black-market-case)

रेमडेसिव्हिर काळा बाजार प्रकरण : मुख्य संशयित जेरबंद

पंचवटीतील के. के. वाघ महाविद्यालयासमोर रेमडेसिव्हिर इंजेक्शन चढ्या दराने विक्री करणाऱ्या तीन नर्स सह एका मेडिकल बॉयला अटक केली होती.अधिक तपासात रविवारी (ता.१६) नाशिकमधून एका संशयिताला ताब्यात घेतले. त्यानंतर लागलीच सोमवारी (ता.१७) आणखी तिघांच्या टोळीस विरार तसेच वाडा (जि. पालघर) येथून ताब्यात घेत काळया बाजारात विक्रीस असलेले एकूण ६१ हजार रूपये किंमतीचे २० रेमडेसिव्हिर इंजेक्शन जप्त केले होते व एकूण संशयीत हे आठ झाले होते.

हेही वाचा: नाशिकच्या इंदिरा गांधी रुग्णालयात सराईताचा गोंधळ; डॉक्टरांना धक्काबुक्की

आडगाव पोलिसांची कामगिरी

या प्रकरणी मुख्य संशयिताचां माग गुन्हे शोध पथक माग काढत होते. मुख्य संशयित सिद्धेश अरुण पाटील असल्याचे समजले. तसेच पालघर येथील कमला लाइफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड, बोईसर, इंजेक्शन बनवणाऱ्या कंपनी काम करीत असल्याची महिती मिळाली. त्यानुसार संशयीत सिद्धेश यास पालघर येथील उमरोळीतील राहत्या घरातून ताब्यात घेत त्यांचेकडून ६३ रेमेडीसिव्हर इंजेक्शन जप्त त्यातील ६२ इंजेक्शन विना लेबल तर १ लेबल सहित जप्त करण्यात आले.सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरिक्षक, इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले, हवालदार सुरेश नरवडे, भास्कर वाढवणे, विजयकुमार सूर्यवंशी, दशरथ पागी, सचिन बाहिकर, वैभव परदेशी, विश्वास साबळे, देवानंद मोरे यांनी केली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले हे करीत आहेत

हेही वाचा: कृषी उत्पन्न बाजार समितीत उलाढाल ठप्प; बंदचा बळीराजाला मोठा फटका

loading image