Latest Crime News | शाळकरी मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape News

Nashik Crime News : शाळकरी मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावास

नाशिक : ‘तुझ्या भावास मारेल’, अशी धमकी देत पंधरा वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करुन दोन वर्ष लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष पोस्को न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी १० वर्ष सश्रम कारावासासह १० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. आकाश कन्हैया लोणारे (२४, रा. उज्ज्वल रो-हाऊस, शिवाजीनगर पाण्याच्या टाकीजवळ, सिन्नर) असे आरोपीचे नाव आहे. (10 years rigorous imprisonment for accused in case of torture of school girl Nashik Latest Crime News)

पीडितेच्या फिर्यादीनुसार, २०१८ नववीच्या वर्गात शिक्षण घेणारी पीडिता नोव्हेंबर २०१८ मध्ये शाळेत जात असतांना आरोपी लोणारे याने तिला बळजबरीने बोलावून घेतले. सिन्नरच्या लोंढे गल्लीतून मोहदरी शिवारातील हॉटेलमध्ये नेऊन ‘तू मला शरीरसंबंध करू दिले नाही तर, तुझ्या भावाला मारेल’ अशी धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते.

त्यानंतर डिसेंबर महिन्यात सिन्नर येथील उद्योगभवन भागातील भाडोत्री घरात नेत अत्याचार केले. दरम्यान, फेब्रुवारी २०१९ मध्ये पीडिता ही शाळेत जाण्यासाठी निघाली असता लोणारे याने तिला रस्त्यातूनच सिन्नर बसस्टॅन्डवरून पळवून नेत बसने गुजरातला नेले. तेथे एका मंदीरात तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून लग्न झाल्याचे सांगितले.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

हेही वाचा: Nashik Crime News : साडेसतरा वर्षीय युवती गर्भवती; म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल

यानंतर डांग जिल्ह्यातील मालेगाव येथे राहणारे बबन गायकवाड यांच्या घरी नेऊन दोन दिवस मुक्कामादरम्यान तिच्यावर पुन्हा लैगिंक अत्याचार केले. याबाबत पीडितेच्या आईने सिन्नर पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपी लोणारे याच्याविरोधात बलात्कारासह पोस्को व अॅट्रोसिटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला होता. निफाडचे तत्कालिन उपविभागीय पोलिस आधिकारी माधव पडीले यांनी तपास करुन दोषारोपपत्र दाखल केले होते.

विशेष पोस्को न्यायालयाचे न्या. देशमुख यांच्यासमोर खटला चालला. विशेष सरकारी वकील दीपशिखा भिडे यांनी 10 साक्षीदार तपासत सरकारी पक्षाची बाजू मांडली. आरोपीविरोधात पुरावे सिद्ध झाल्याने न्या. देशमुख यांनी 10 वर्ष सश्रम कारावास आणि दहा हजारांचा दंड, अपहरणाच्या कलमाखाली 2 वर्ष कारावास आणि पाच हजारांचा दंड ठोठावला आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : कुरापती काढून हाणामाऱ्या; कोयत्यांचा होतोय सर्रास वापर