Latest Crime News | कुरापती काढून हाणामाऱ्या; कोयत्यांचा होतोय सर्रास वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News : कुरापती काढून हाणामाऱ्या; कोयत्यांचा होतोय सर्रास वापर

नाशिक : किरकोळ भांडणाच्या कुरापतीवरून हाणामारीच्या घटना शहरात सातत्याने घडत आहेत. परंतु, या घटनांमध्ये संशयितांकडून सर्रासपणे कोयत्याचा वापर केला जातो आहे. सातपूरच्या श्रमिकनगर आणि अंबडच्या चुंचाळे शिवारात घडलेल्या दोन घटनांमध्ये संशयितांनी कोयत्याने वार करून दोघांना जखमी केल्याचा प्रकार घडला आहे.

शहर पोलिसांकडून चोख नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केल्याचा दावा केला जात असताना, संशयितांच्या वाहनांमध्ये कोयते येतातच कसे, असा सवाल उपस्थित होतो आहे. अशा घटनांमुळे त्या परिसरामध्ये गुंडगिरीत वाढ होऊन नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होते आहे. (fights over old dispute axe widely used 2 injured in two incidents in Satpur Ambad Nashik Crime News)

सातपूर परिसरातील श्रमिकनगर येथे कुरापत काढून एकाला दोघांनी मारहाण करीत कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना घडली. सर्फराज खान व त्याचा मित्र असे दोघा संशयितांची नावे आहेत. अभिषेक चंद्रकांत पंडित ( रा. यशराज डुप्लेक्स, श्रमिकनगर, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शनिवारी (ता. १९) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अभिषेक औषधे घेऊन दुचाकीवरून घरी जात होता. त्यावेळी संशयित सर्फराज व त्याच्या मित्राने त्यास अडविले आणि तु माझ्या भावाला शिव्या का दिल्या असे विचारले.

त्यावेळी अभिषेक याने कोणाला शिव्या दिल्या, तुझा कोणता भाऊ असे म्हटल्याने संशयितांनी त्यास शिवीगाळ करीत मारहाण केली तर. सर्फराज याने त्याच्याकडील ॲक्टिवाच्या (एमएच १५ डीआर ८०२९) डिक्कीतून कोयता काढून डोक्यावर व हातावर मारून जखमी केले. याप्रकरणी सातूपर पोलिसात संशयितांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित सर्फराज यास अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

हेही वाचा: Nashik Crime News : दीपक दिवे खून प्रकरणी पोलिसांना दिशा मिळेना

तर, दुसऱ्या घटनेत अंबड परिसरातील चुंचाळे शिवारात दोघांनी एकाला मारहाण करून धारदार हत्याराने मारून जखमी केल्याची घटना घडली. सुरेश बोराडे (२३), विकास बनसोडे (२३, रा. दोघे रा. चुंचाळे शिवार, अंबड) असे संशयितांची नावे आहेत. सुरज सुभाष जाधव (रा. चुंचाळे शिवार, अंबड) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शनिवारी (ता. १९) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास किरकोळ भांडणांची कुरापत काढून संशयितांनी सुरजला शिवीगाळ केली. तर सुरेश बोराडे याने धारदार हत्याराने सुरजच्या पोटावर व मांडीवर वार करून जखमी केले. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाकाबंदी ठरतेय फोल

पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये पोलिस ठाणेनिहाय नाकाबंदी केली जाते. यादरम्यान दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी केली जाते. असे असताना, संशयितांनी त्यांच्याकडील दुचाकीच्या डिक्कीतून कोयते काढून समोरच्या जखमी केले आहे. अशा स्वरुपाच्या घटना वारंवार घडत असल्याने नाकाबंदीमध्ये पोलिस नेमके कसली तपासणी करतात, असा सवाल उपस्थित होतो आहे. तसेच या घटनांमधून संशयित परिसरात स्वत:ची दहशत पसरविण्याही प्रयत्न करीत असल्याने नागरिकांमध्येही भितीचे वातावरण आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : साडेसतरा वर्षीय युवती गर्भवती; म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल