Nashik Crime: गंभीर गुन्ह्यांची 100 टक्के उकल! शहर पोलिसांची पहिल्या सहामाहीतील समाधानकारक कामगिरी

Crime News
Crime Newsesakal

Nashik Crime : चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत शहर पोलिस आयुक्तालयाचा लेखाजोखा पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे. मात्र, गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची उकल करण्यात शहर पोलिसांना यश आलेले आहे.

चोऱ्या, घरफोड्यांच्या गुन्ह्यांचा तपास प्रगतिपथावर आहे. त्यामुळेच शहर पोलिस पहिल्या सहामाहीत ‘कही खुशी, कही गम’ अशा स्थितीत आहे.

असे असले तरी गंभीर गुन्ह्यांच्या तपासात मारलेली मजलही लक्षवेधी आहे. गुन्हे रोखण्यासह शहराची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहर पोलिसांकडून कडक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू आहे. (100 percent solution to serious crimes Satisfactory performance of city police in first half Nashik Crime)

शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत १३ पोलिस ठाण्यांसह एक सायबर पोलिस ठाणे, असे १४ पोलिस ठाणे आहेत. शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढत आहे.

त्यामुळे शहरातील गुन्हेगारीतही वाढ होणे साहजिक असले तरी त्यावर अंकुश ठेवण्यात शहर पोलिसांनी समाधानकारक पावले उचलली आहेत, हे गंभीर गुन्ह्यांच्या तपासावरून दिसून येते.

गत २०२२ या वर्षातील पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत २०२३ मध्ये जूनअखेरपर्यंतच्या गुन्ह्यात ५८१ ने वाढ झालेली आहे. यानुसार गेल्या वर्षी सहा महिन्यांत गुन्हे शोधाचे प्रमाण ५५ टक्के होते.

या वर्षी दोन टक्क्यांची भर पडली असून, ते ५७ टक्के इतके आहे. विशेषत: खून आणि प्राणघातक हल्ल्यांसारख्या गंभीर गुन्ह्यात काहीशी वाढ झालेली आहे. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत.

गुन्हेगारी टोळ्यांविरोधात थेट मोक्कान्वये कारवाई केली जात आहे. दोन वा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्यांना थेट स्थानबद्ध करीत मध्यवर्ती कारागृहात दाखल केले जात आहेत.

खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा, दंगल या स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्यांची शहर पोलिसांना उकल करण्यात यश आलेले आहे. गुन्हेगारी टोळ्यांमधील गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण अत्यल्प आहे, तर तत्कालिक वा अन्य कारणातून शरीराविरोधातील गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे. गुन्ह्यांची उकल होऊन गुन्हेगारांस अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Crime News : घरीच जेवण्याचा आग्रह केल्याने पतीने पत्नीला लाकडी स्टंपने बदाडले

घरफोड्या, चेन स्नॅचिंगचे आव्हान

शहर पोलिसांसमोर चोऱ्या, दुचाकी व सोनसाखळी चोऱ्या, घरफोड्या या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण मोठे आव्हान आहे. एकीकडे दुचाकी चोरटे गजाआड होत असतानाही दुचाकी चोऱ्या थांबलेल्या नाहीत.

सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने होत आहेत. त्यासाठी पोलिसांकडून नाकाबंदी, वाहनांची तपासणी, कोम्बिंग ऑपरेशन, सर्च मोहीम सातत्याने राबविले जात आहे.

गुन्ह्यांची नोंद अन्‌ चौकसभा

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलिस ठाण्यात आलेल्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेऊन तपास करणे आणि गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेशच आहेत. त्यामुळे नोंद गुन्ह्यांचा आकडा वाढत असला तरी तक्रारदाराचे निराकरणही गरजेचे असल्याचे स्पष्ट मत आयुक्त शिंदे यांनी वारंवार व्यक्त केलेले आहे.

टवाळखोरांविरोधात कारवाईसाठी आणि शहरवासीयांना पोलिसांबद्दल विश्वास वाढवा, यासाठी पोलिस ठाणेनिहाय नागरिकांच्या उपस्थितीमध्ये चौकसभा घेतल्या जात आहेत. त्यामुळे पोलिस-नागरिकांमध्ये सुसंवाद वाढून गुन्हेगारी घटनांना आळा घालणे शक्य होणार आहे.

"गुन्हेगारी टोळ्यांविरोधात मोक्का, तर गुंडागर्दी करणाऱ्यांविरोधात एमपीडीएअंतर्गत कारवाई केली जात आहे. शहर भयमुक्त असणे, यालाच पोलिसांचे प्राधान्य आहे. त्यासाठी ठोस उपाययोजनांसह नागरिकांच्या समन्वयातून पोलिस काम करत आहे."

- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, नाशिक

Crime News
Crime News: घरकाम करणाऱ्या महिलेने मालकाच्या घरातून चोरले 11 लाख रुपये, 5 वर्षात बनली लखपती पण...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com