Latest Marathi News | शंभरहून अधिक वर्षांपासून दिवाळीच्या ‘त्या’ आहेत साक्षीदार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kedabai Ahirrao

Nashik : शंभरहून अधिक वर्षांपासून दिवाळीच्या ‘त्या’ आहेत साक्षीदार!

जायखेडा (जि. नाशिक) : सौंदाणे (ता. मालेगाव) येथील १०४ वर्षांच्या केदाबाई यशवंतराव अहिरराव यांनी आपले मुले, सुना, नातवंडे व पतवंडांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांनी शंभर वर्षांपूर्वीची दिवाळी व आता असलेल्या दिवाळीची अनुभूती त्या सगळ्यांना अगदी उत्साहात सांगत असतात. (104 years old Kedabai Ahirrao from Saundane saw more than 100 diwali festival till date nashik news)

हेही वाचा: Nashik : गंभीर गुन्ह्याचा तपास रखडला; गुन्हे शाखेत पोलिस अधिकाऱ्यांची वाणवा

केदाबाई अहिरराव यांना प्रल्हाद, मच्छिंद्र व गोरख हे तीन मुले आहेत. तर सुंदरबाई या एक विवाहित कन्या आहेत. तसेच सुना, नातवंडे- पतवंडे असा कुटुंबाचा वटवृक्षच आहे. शंभराहून अधिक दिवाळी सण, पाडवे अनुभवलेल्या या मातोश्रीचा वृद्धापकाळही तितकाच आनंददायक जात आहे. सध्याच्या दिवाळी सणाचे बदलत गेलेले रुपडे अनुभवणारी आजीबाई विज्ञानाचे बदलत चाललेले तंत्रज्ञानही अनुभवत आहेत.

पतीबरोबर शेतीची मशागत करत खंबीर साथ देणाऱ्या आजीबाईंच्या सुखकर वृद्धापकाळाला कठोर कष्टाची पार्श्वभूमी आहे. आज वयोमानापरत्वे शरीरावर पडलेल्या सुरकुत्या नजरेस भरतात. मात्र नातेवाईक, नातवंडे-पतवंडे यांना पाहताच क्षणी ओळखणारी त्यांची नजर अद्यापही शाबूत आहे. तेलाने दिवे लावणारी दिवाळी, कुंभाराकडून करून आणलेल्या पणत्या अन् प्रवासासाठी बैलगाडी, संपर्कासाठी निरोप या पलीकडे कोणतेही साधन न अनुभवलेल्या केदाबाईंना तंत्रज्ञानाच्या नवनवीन शोधासह स्मार्टफोनचेही विशेष कौतुक वाटते. मुलाबाळांसह शेतातच राहणारी आजीबाई जगण्याची प्रेरणा देणारे रसायन असल्याचे त्यांचे तिन्ही मुले अगदी अभिमानाने सांगतात.

हेही वाचा: Nashik : सूर्यग्रहणाचा मनमाडकरांनी अनुभवला अविष्कार; सन गॉगल्स, X- ray पेपरचा वापर