Nashik : गंभीर गुन्ह्याचा तपास रखडला; गुन्हे शाखेत पोलिस अधिकाऱ्यांची वाणवा

 Crime Branch police officers News
Crime Branch police officers Newsesakal

नाशिक : शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या गंभीर गुन्ह्यांचा तपास रखडलेला आहे. पोलिस ठाण्याकडे गुन्ह्यांची उकल करण्याशिवाय, अतिरिक्त कामांचाही बोजा असल्याने गंभीर गुन्हेही रखडल्याचे चित्र आहे. तर, याच गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समांतर तपास शहर गुन्हे शाखेच्या युनिटकडून केला जात असतो. परंतु या शहर गुन्हे शाखेच्या युनिटकडेही तपास करण्यासाठी सहायक निरीक्षक ते उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची वानवा असल्याने तपासाला मर्यादा पडत असल्याचे बोलले जाते. मात्र या साऱ्या प्रकारात अत्यंत गंभीर स्वरूपाचे तपास रखडलेले आहेत. (serious crime investigation stalled lack of Police Officers in Crime Branch nashik Latest Marathi News)

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत १३ पोलिस ठाणे आणि एक सायबर पोलिस ठाणे असे १४ ठाणे आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये शहरात घरफोडी, दरोडे, चोऱ्या, हाणामाऱ्या, लूटमार, चैनस्नॅचिंग, आर्थिक फसवणूक, खून, प्राणघातक हल्ले यासारखे गंभीर स्वरूपाच्या घटना घडत आहेत. तर गेल्या दोन- तीन आठवड्यांमध्ये सोनसाखळी व वाहन चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. परंतु यापैकी बहुतांशी गुन्ह्यांची उकल अद्यापही होऊ शकली नाही. गुन्हे दाखल झाल्यानंतर ठाण्यांमध्ये गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार तपास अधिकाऱ्यांकडे तो वर्ग केला जातो.

घटनास्थळांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भेटी दिल्या जातात. मात्र, पोलिस ठाण्याकडे गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी असलेल्या अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कामांचाही बोजा असल्याची ओरड नेहमीच केली जाते. त्यामुळे अनेकदा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समांतर तपास शहर गुन्हे शाखेअंतर्गत असलेल्या गुन्हे शाखाही (युनिट) करतात. नाशिक शहर गुन्हे शाखेचे युनिट एक, दोन आणि मध्यवर्ती गुन्हे शाखा असे तीन युनिट आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये या युनिटस्‌च्या माध्यमातून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास करण्यात आला.

समांतर तपास करणाऱ्या या युनिटमध्ये सहायक पोलिस निरीक्षक ते उपनिरीक्षकांची वानवा दिसून येत आहे. त्यामुळे एका गुन्ह्याचा तपास सुरु असताना, दुसरा गुन्हा घडतो, त्याचा तपास सुरु असतानाच तिसरा गुन्हा घडतो. त्यामुळे गुन्ह्यांची जंत्री वाढते आहे. त्यातुलनेमध्ये गुन्ह्यांची उकल मात्र होत नसल्याचे चित्र आहे. कमी मनुष्यबळावर गुन्ह्यांचा तपास करणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना काहीसे जिकिरीचे जात आहे.

 Crime Branch police officers News
Nashik : शहरात धावणार Electric Bus; NMCचा केंद्र शासनाला पुन्हा प्रस्ताव

रखडलेले गंभीर गुन्हे

* सातपूरला उद्योजकांच्या बंगल्यावर भरदिवसा पडलेला दरोडा

* सिडकोत राजकीय पदाधिकाऱ्यावर अज्ञातांकडून झालेला गोळीबार

* ठक्कर बझार रस्त्यावर तीस किलो चांदीची लूटमार

* नाशिकरोड हद्दीत उसाच्या शेतात आढळलेला तरुणीचा मृतदेह.

* अंबडच्या चुंचाळे शिवारात परप्रांतीयांची गळा चिरून करण्यात आलेली हत्या

* गेल्या दोन आठवड्यातील १३ चैनस्नॅचिंगच्या घटना

कमी मनुष्यबळावर तपास

शहराचे माजी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी शहर गुन्हे शाखेअंतर्गत असलेल्या युनिट्सची गरजचे म्हणत, युनिटमध्ये कार्यरत प्रत्येकी चार ते पाच सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक अधिकाऱ्यांची इतरत्र वर्ग केले, पोलिस ठाण्यांमध्ये बदल्या केल्या. त्यानंतर विद्यमान पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पदभार घेऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र, अद्यापही या तीनही युनिटमध्ये तपास कामासाठी सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक देण्यात आलेले नाहीत. अत्यंत कमी मनुष्यबळावर तपास सुरू असल्याने गुन्ह्यांची उकल होण्यावर परिणाम होत असल्याचे बोलले जाते.

 Crime Branch police officers News
Nashik : Electric Audit कागदावरच; Mahavitaran कंपनीकडून प्रतिसाद नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com