10th Result 2020 : नाशिक विभागाचा निकाल ९३.७३ टक्‍के; यंदाही मुलींचीच बाजी

exam_result75942.jpg
exam_result75942.jpg

नाशिक : महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावीचा ऑनलाइन निकाल बुधवारी (ता.२९) जाहीर झाला आहे. नाशिक जिल्‍ह्‍यासह धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्‍ह्‍याचा समावेश असलेल्‍या नाशिक विभागाचा निकाल ९३.७३ टक्‍के लागला आहे. विभागात नाशिक जिल्‍हा ९४.९३ टक्‍यांसह अव्वल स्‍थानी आहे.

जिल्‍ह्‍याचा निकाल निकाल ९४.९३ टक्‍के

मार्च २०१९ मध्ये विभागाचा निकाल ७७.५८ टक्‍के लागला होता, तर यंदा उत्तीर्णांच्‍या टक्‍केवारीत घसघशीत वाढ झाली आहे. गेल्‍या वर्षी तोंडी परीक्षा घेण्यात आली नव्‍हती. मात्र यंदा तोंडी परीक्षेचा गुणवारीवर फरक जाणविल्‍याने निकाल उंचावल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे. इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाइन स्‍वरूपात जाहीर होताच, विद्यार्थी व पालकांनी जल्‍लोष केला. संकेतस्‍थळावरील निकाल डाउनलोड करत नातेवाईक, मित्रमंडळीत व्‍हायरल करण्यात येत होता. नाशिक विभागाचा निकाल ९३.७३ टक्‍के लागला आहे. यात नाशिक जिल्‍ह्‍यात प्रविष्ठ झालेल्‍या ८९ हजार ०७८ विद्यार्थ्यांपैकी ८४ हजार ५५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्‍ह्‍याचा निकाल निकाल ९४.९३ टक्‍के लागला आहे.

विद्यार्थी व पालकांचा जल्‍लोष

धुळे जिल्‍ह्‍यात २८ हजार ९७५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते, त्‍यापैकी २७ हजार ३८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून धुळ्याचा निकाल निकाल ९४.५० टक्‍के लागला आहे. जळगाव जिल्‍ह्‍यात ५९ हजार ०७१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते, त्‍यापैकी ५५ हजार २४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या जिल्‍ह्‍याचा निकाल ९३.५१ टक्‍के इतका लागला आहे. तर नंदुरबार जिल्‍ह्‍यात २० हजार ८५२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्‍यापैकी १८ हजार ३७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हा निकाल ८८.१४ टक्‍के लागला आहे.

म्‍हणून निकाल उंचावला..

गेल्‍या वर्षी परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आला होता. त्‍यानुसार मुल्‍यमापन पद्धतीत तोंडी परीक्षेचा समावेश नव्‍हता व केवळ लेखी परीक्षेवर आधारीत निकाल जाहीर केला होता. यातून गेल्‍यावर्षी विभागाचा निकाल ७७.५८ टक्‍के लागला होता. मात्र तोंडी परीक्षा रद्द करण्याच्‍या निर्णयाचा विरोध झाल्‍यानंतर मार्च २०२० मध्ये पुन्‍हा तोंडी परीक्षा व लेखी परीक्षेवर आधारीत गुणदान करण्यात आले. त्‍याचा परीणाम म्‍हणून यंदा निकालाच्‍या टक्‍केवारीत वाढ झालेली असल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे. चारही जिल्‍ह्‍यांमध्ये मुलींचीच आघाडी राज्‍याप्रमाणे नाशिक विभागातही मुलींनीच बाजी मारलेली आहे. चारही जिल्‍ह्‍यात मुलांच्‍या टक्‍केवारीच्‍या तुलनेत मुलींची आघाडी असल्‍याचे चित्र आहे.

चारही जिल्‍ह्‍यात मुलींची आघाडी (मुले- मुली)

नाशिक ----- ९३.६१, ९६.४३
धुळे ----- ९३.३०, ९६.११ 
जळगाव ----- ९२.१०, ९५.४०  
नंदुरबार ----- ८५.९६, ९०.७० 

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com