Nashik News: पुरणगावात विजेच्या धक्क्याने 11 मेंढ्यांचा मृत्यू

death by lightning
death by lightningsakal

Nashik News : पुरणगाव (ता. येवला) येथे गावठाण हद्दीतील डीपीजवळ मेंढपाळ महादू लक्ष्मण वाघमोडे (रा. दहेगाव, ता. नांदगाव) यांच्या मालकीच्या अकरा मेंढ्यांना विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला.

शुक्रवारी (ता. ८) येथे संततधारेने हजेरी लावली. (11 sheep died due to lightning in Purangaon Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

death by lightning
Dhule Accident News : आयशर उलटल्याने सोनगीरच्या डॉ. सोनवणेंचा अपघाती मृत्यू; सारेच हळहळले

यादरम्यान दुपारी साडेतीनच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन वीजप्रवाह थेट जमिनीत उतरला. तेथेच मेंढ्या चरत असल्याने विजेचा धक्का बसून अकरा मेंढ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे मेंढपाळाचे एक ते दीड लाखाचे नुकसान झाले.

मुखेड गटाचे पशुधन अधिकारी डॉ. अमोल दराडे यांनी पंचनामा करून मेंढ्यांचे शवविच्छेदन केले. तलाठी कल्याणसिंग सुलाणे यांनी तहसीलदारांना प्राथमिक अहवाल सादर केला.

पोलिसपाटील गणेश ठोंबरे, भरत महाराज ठोंबरे, दत्तू ठोंबरे, मच्छिंद्र ठोंबरे, सुनील वरे, महादू वाघमोडे यांचे नातेवाईक, महावितरणचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

death by lightning
Nashik Bribe Crime : येवल्यात 9 हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यासह एकास अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com