esakal | नाशिकमध्ये डेंगी, चिकुनगुनियाचा उद्रेक; पाचच दिवसात आढळले ११० रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

डेंगी रोखणारे डास विकसित

नाशिकमध्ये डेंगी, चिकुनगुनियाचे पाचच दिवसात ११० रुग्ण

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शहरात चिकुनगुनिया व डेंगीचा उद्रेक कायम असून पाच दिवसात डेंगीचे सत्तर तर चिकुनगुनियाचे चाळीस रुग्ण नव्याने आढळले आहेत. डेंगी व चिकुनगुनियाचा सर्वाधिक उद्रेक सिडको विभागात असल्याचे दिसून येत आहे. शहरात औषध फवारणी होत नसताना जीवशास्त्रज्ञ विभागाकडून मात्र आठ महिन्यात दहा लाखांहून अधिक ठिकाणी फवारणी झाल्याचा दावा केला आहे.


कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना शहरात डेंगी, चिकुनगुनियासह साथीच्या आजारांनी तोंड वर काढले आहे. जानेवारी ते ऑगस्ट अखेर शहरात डेंगीचे ५८८ रुग्ण आढळले होते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांमध्ये तब्बल सत्तर रुग्ण नव्याने आढळून आल्याने ६४७ वर रुग्णसंख्या पोहोचली आहे. सिडको विभागात डेंगीचा उद्रेक कायम आहे. सिडकोत १४५, पूर्व मध्ये ४४, नाशिक रोड विभागात १०१, पंचवटीत ११३, पश्‍चिम विभागात ६६ तर सातपूर विभागात १०८ रुग्ण डेंगीचे आढळले आहेत. चिकुनगुनियाचे रुग्ण देखील सिडको विभागातचं अधिक आढळले आहेत. सिडकोत १३८, सातपूर १३६, पूर्व भागात २०, पश्‍चिम विभागात ७०, नाशिक रोड विभागात २४, पंचवटी विभागात ५४ चिकुनगुनियाचे रुग्ण आढळले. सप्टेंबरच्या पाच तारखेपर्यंत चाळीस नवीन रुग्ण आढळले.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यातील १२९ पैकी ८३ कोरोना बाधित ग्रामीणमधीलदहा लाख ठिकाणी औषध फवारणी

शहरात डेंगीचा उद्रेक वाढतं असताना नागरिकांकडून औषध व धूर फवारणी होत नसल्याची ओरड होत आहे. परंतु आरोग्य विभागाने दहा लाख १५ हजार ४५२ ठिकाणी औषधे व धूर फवारणी झाल्याचा दावा केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. अळीचे ठिकाणे तपासण्यासाठी आठ लाख ९१ हजार ५७८ घरांची तपासणी केल्याचा दावा केला जात आहे. शहरात पावणेपाच लाखांच्यावर मालमत्ता आहेत. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार एका ठिकाणी दोनदा फवारणी झाल्याचा निष्कर्ष निघतो. वास्तविक अनेक ठिकाणी औषधे व धूर फवारणीचं होत नसल्याच्या तक्रारी असताना एका ठिकाणी दोनदा फवारणी झाल्याचा दावा फोल ठरतो. आरोग्य विभाग दाव्यावर ठाम असून एका ठिकाणी पाच ते सहा वेळेस फवारणी होऊ शकते, असे समर्थन केले जात आहे.


हेही वाचा: PHOTOS : बैलाच्या पाठीवर रंगले राजकारणाचे प्रतिबिंब

loading image
go to top